राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर, शिलाँग कोर्टाचा निर्णय
इंदौर येथील व्यापारी राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी शिलाँगच्या स्थानिक न्यायालयाने दोन सहआरोपींना जामीन मंजूर केला आहे. या खटल्यात राजा याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. मेघालयातील हनीमूनदरम्यान 23 मे 2025 रोजी राजा याची हत्या झाली. पोलिसांनी याला ‘ऑपरेशन हनीमून’ असे नाव दिले आहे.
सोनमने तीन भाडोत्री हत्यारांसह राजला मारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. हत्या वेई सॉडॉन्ग धबधब्याजवळ झाली, जिथे राज याच्यावर हल्ला करून त्याचा मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला. सोनम आणि राज कुशवाह यांनी हत्येची कबुली दिली असली, तरी दोन आरोपींनी मॅजिस्ट्रेटसमोर बोलण्यास नकार दिला आहे.
पोलिसांकडे रक्ताने माखलेले कपडे, हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार आणि सीसीटीव्ही फुटेजसह पुरावे आहेत. मेघालय पोलिसांचे विशेष तपास पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. सोनमचा मोबाइल फोन आणि इतर काही पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List