Beed News – विकास निसर्गाच्या मुळावर; बीड-परळी रस्ता रूंदीकरणासाठी तीन हजार झाडांची कत्तल

Beed News – विकास निसर्गाच्या मुळावर; बीड-परळी रस्ता रूंदीकरणासाठी तीन हजार झाडांची कत्तल

विकास निसर्गाच्या मुळावर उठला आहे. रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केली जात आहे. बीड-परळी या रस्त्याचे रूंदीकरण सध्या वेगाने सुरू आहे. रूंदीकरण करताना रस्त्यात येणारी प्रत्येक गोष्ट आडवी केली जात आहे. बीडपासून परळीपर्यंत रूंदीकरणाच्या आड येणारी तब्बल तीन हजार झाडांची कत्तल झाली आहे. तीनशे, चारशे वय असणाऱ्या वड, चिंच, लिंबाची झाडं तोडण्यात आले आहेत. घाटसावळी-मोरवड या ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. झाडे नव्याने लावण्याचे नियोजन असले तरी, ती झाडांना पुन्हा पालवी फुटेल का? झाडं वाढतील का? याबाबत संशय निर्माण होत आहे.

बीड-परळी या 80 कि.मी.रस्त्याचे रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या बीडपासून जरूडपर्यंत रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. आता जरूडपासून वडवणीपर्यंत आणि वडवणीपासून सिरसाळ्यापर्यंत रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. सिमेंट रस्त्याच्या या कामात पर्यावरणाचा सर्रास र्‍हास केला जात आहे. रस्ता करत असताना या रस्त्यावर असलेले नैसर्गिक झाडे तोडली जात आहेत. 80 कि.मी.अंतरामध्ये तीन हजार मोठी झाडे तोडली जात आहेत. लहान-मोठ्या झाडांची तर नोंदही नाही. तीन हजार झाडांमध्ये वड, चिंच, लिंब आणि जांबळाच्या झाडांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे इतिहासाची आणि भुगोलाची साक्ष देणारी ही झाडे विकासाच्या नावाखाली नष्ट केली जात आहेत. त्यामुळे इतिहासच नव्हे तर भूगोलही बदलला जाणार आहे. सुसाट रस्त्यावरून पळताना वडाच्या झाडांनी वेढलेली घाटसावळी काही महिन्यामध्ये लुप्त पावणार आहे. वडवणी-तेलगाव रोडवर मोरवड, कुप्पा, उपळी या गावांची ओळख त्या झाडावर होती. त्याही झाडांची भविष्यामध्ये कत्तल केली जाणार आहे. दोन्ही बाजुंनी रस्ता आच्छादलेली महाकाय झाडे उन्हाळ्यामध्ये सावली देण्याचे काम करत होते. तीनशे वर्षाचा कालावधी उलटलेली ही झाडे अवघ्या काही तासांमध्ये इलेक्ट्रॉनिक कटई मशिनने नेस्तनाबूत केली जात आहेत. रस्ता पूर्ण झाल्यानंतर दोही बाजूने झाडे लावण्याचे त्या टेंडरमध्ये समावेश असल्याने झाडे लावली जातील. मात्र ती पोसली जातील की नाही आणि वाढतील की नाही याची शक्यता धूसर आहे. झाडे वाचवूनही रस्ता झाला असता मात्र, ती मानसिकता कोणास शिल्लक न राहिल्याने इतिहासाची साक्ष देणारे महाकाय वृक्ष धारातिर्थी पडत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिलीप वेंगसरकर कुठाय? दिलीप वेंगसरकर कुठाय?
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसापासून स्टार स्पोर्ट्स आणि जिओ-हॉटस्टारवर ‘लेजेंड्स आर मेड इन इंग्लंड’ ही चित्रफीत दाखवली जात आहे. आख्यायिका इंग्लंडमध्ये...
पाकिस्तानला मसूद अझहर कुठे आहे, हे मला माहित नाही, दहशतवादी प्रेमी बिलावल भुट्टो यांचं वक्तव्य
भाड्याची खोली, मजुरीवर उदरनिर्वाह अन् वार्षिक उत्पन्न 9 कोटी; आयकर विभागाने धाडली नोटीस
Ratnagiri News – बाळासाहेब खेर यांचे रत्नागिरीत स्मारक उभारा, शिवसेना उपनेते बाळ माने यांची मागणी
न्यायाधीश नियुक्ती प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप होऊ देणार नाही; सरन्यायाधीशांची महत्वपूर्ण भूमिका
तिबेटच्या मुद्यांवर सावधगिरी बाळगा; रिजिजू यांच्या विधानानंतर चीनने हिंदुस्थानला सुनावले
Sindhudurg News – SBI च्या अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागिरकाची केली आर्थिक फसवणूक, गुन्हा दाखल