Why Junk food is Harmful – जंक फूड खाण्याचे हे आहेत आरोग्यासाठी धोके, वाचा

Why Junk food is Harmful – जंक फूड खाण्याचे हे आहेत आरोग्यासाठी धोके, वाचा

सध्या आपल्या आहारामध्ये जंक फूड हा एक परवलीचा शब्द बनलेला आहे. एकूणच काय तर पिज्जा, बर्गर तत्सम जंक फूड हाच आपला परिपूर्ण आहार झालेला आहे. या आहारामुळे आपल्या शरीराला फायद्याऐवजी तोटाच होतो. असे खाद्यपदार्थ आणि पेये आरोग्याला हानी पोहोचवण्यासोबतच अनेक आजारांचे कारण बनतात. म्हणून काही खाद्यपदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे.

जंक फूडमुळे आपल्या शरीरात अधिकांश प्रमाणात चरबी जमा होते. ही चरबी यकृतामध्ये जमा होण्यास सुरुवात होते त्यामुळेच फॅटी लिव्हर होते. तसेच जंक फूडमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे, यकृतातील ग्लुकोजचे फॅटमध्ये रुपांतर होते हेच फॅटी लिव्हरचे प्रमुख कारण आहे.

 
जंक फूडचे दुष्परिणाम काय आहेत?

  • लठ्ठपणा
    जंक फूडचा हा एक मुख्य दुष्परिणाम आहे. जंक फूडच्या वरचेवर सेवनामुळे, लठ्ठपणा वाढण्यास मदत होते. यामुळे हृदयरोग, स्नायूंचे विकार, मधुमेह, पित्ताशयातील खडे, श्वास घेण्यास त्रास, गर्भधारणेदरम्यान समस्या इत्यादी अनेक आजारांचे मूळ कारण लठ्ठपणा आहे.

  • मधुमेह
    जंक फूड देखील टाइप 2 मधुमेहासाठी जबाबदार आहे. साखरेचे वारंवार सेवन हे मधुमेहाचे एक कारण आहे आणि जंक फूडमध्ये साखर आणि खराब कोलेस्ट्रॉल असते. मधुमेहामुळे आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्या निर्माण होतात.
  • कर्करोग
    जंक फूड मध्ये खूप रसायने असल्यामुळे, कर्करोग होण्याचा धोका असतो. जंक फूडमुळे पोट, कोलेस्ट्राॅल, श्वसन इत्यादी कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. जंक फूडमध्ये बरीच रसायने असतात जी शरीरात कर्करोगासाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतात.

  • हृदयाचे आजार
    जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे अधिक प्रमाणात जंक फूड खाणे हे हृदयरोगाला कारणीभूत ठरते. जंक फूडमध्ये चरबी, साखर आणि हृदयावर परिणाम करणारी रसायने देखील जास्त असतात.
  • पचनाचे आजार
    कॅलरीज, कार्ब्स आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले अन्न शरीराच्या पचन प्रक्रियेवर जास्त ताण आणू शकते.

रोज सुका मेवा खाणे गरजेचे आहे का? वाचा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी कराल तर जेलची हवा, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी कराल तर जेलची हवा, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी आणि गोंधळ घालणाऱया व्हीआयपी भक्तांवर थेट गुन्हे दाखल करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी कुमार...
मराठी शिकायचे आहे – सुनील शेट्टी
इंग्लंडचं ठरलं! हिंदुस्थानचं कधी ठरणार? हिंदुस्थानचे अंतिम अकरा अद्यापही गुलदस्त्यात
‘कॅप्टन कूल’ होणार धोनीचा ब्रॅण्ड, ट्रेडमार्क नोंदणीसाठी केलेला अर्ज स्वीकृत
यशस्वी ‘मुंबईकर’ झाला, एमसीएने नाहरकरत प्रमाणपत्र मागे घेतले
जग्गूदादाला हवीय वाळकेश्वरच्या चाळीतील ‘ती’ खोली
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस