Jalana News मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून सर्वत्र घबराट पसरली आहे. संध्या प्रभुदास पाटोळे असे आठ वर्षीय मयत चिमुकलीचं नाव आहे.
जालन्यातील गांधीनगरात संध्या पाटोळे ही सकाळी अंगणात खेळायली गेली असता तीन ते चार कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत तिचे लचके तोडले. यातच तिचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळं नागरिकांमध्ये तीव्र संताप असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान घटनेची माहिती शहरात पसरतात महानगरपालिकेच्या विरोधात जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. मागील एक वर्षापासून जालन्यातील सामाजिक संघटना, वेगवेगळ्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत महानगरपालिकेला लेखी निवेदने देण्यात आलेली आहेत. परंतु प्रत्येक वेळेस “टेंडर काढलेले आहे, लवकरच कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यात येईल” असे पोकळ आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात येऊन सामाजिक संघटनांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली गेली.
या अगोदर सुद्धा काही बालकांना कुत्र्यांनी चावलेले आहे. परंतु आजच्या या घटनेमध्ये एका आठ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागल्याने शहरांमध्ये महानगरपालिकेविरुद्ध नागरिकात संताप व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List