भुताची भीती दाखवून दागिने लाटले
तुझ्या आईला एका भयंकर भुताने पछाडले असून ते तुझ्या आईला मारून टाकेल. त्या भुतामुळेच आईची मानसिक स्थिती ढासळली आहे. आईला भुतापासून मुक्त करावेच लागेल. त्यासाठी घरातील दागिने घेऊन यावे लागतील, अशी पद्धतशीर भीती दाखवून आजारी महिलेचे तिच्या मुलीकरवी साडेतीन लाखांचे दागिने लाटणाऱ्या महिलेविरोधात पार्क साईट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दागिने लुटणाऱ्या त्या महिलेला ताब्यात घेतले आहे.
सुनील साळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पार्क साईट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनिल साळवी यांची पत्नी दीप्ती या गेल्या अनेक महिन्यांपासून मानसिक रुग्ण असून त्यांच्यावर शीव इस्पितळात उपचार सुरू आहेत. पण काही केल्या त्रास कमी होत नसल्याने दीप्ती यांची मुलगी रिद्धी हिला रिजवाना नावाच्या महिलेने पार्क साइटच्या गॅरेज गल्लीत राहणाऱ्या हजरत मरियम राणा हिला भेटण्यास सांगितले. त्यानुसार रिद्धी तिच्या आईला दीड महिने हजरत मरियम राणा या महिलेकडे नेले. तेव्हा दीप्ती यांना भूतबाधा झाली आहे. वेळीच भुताचा बंदोबस्त न केल्यास ते तुझ्या आईचा बळी घेईल, असे राणा हिने रिद्धीला घाबरवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List