अक्षय कुमारने परेश रावल यांच्याविरोधात दाखल केला 25 कोटींचा खटला, काय आहे प्रकरण
अभिनेता अक्षय कुमार याने दिग्गज अभिनेते परेश रावल यांच्याविरोधात 25 कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘हेरा फेरी 3’ सिनेमाच्या कास्टची चर्चा सुरु आहे. अशात परेश रावल यांनी आधीच सांगितलं होतं की, ते आता ‘हेरा फेरी 3’ सिनेमाचा भाग नसतील. सिनेमातील काही गोष्टी त्यांना खटकल्यामुळे त्यांनी सिनेमात भूमिका साकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान एक हैराण करणारी माहिती देखील समोर आली आहे. अक्षय कुमारने त्याच्या प्रॉडक्शन हाऊस केप ऑफ गुड फिल्म्सच्या माध्यमातून परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एवढंच नाही तर शूटिंग अर्ध्यावर सोडल्याबद्दल 25 कोटी रुपयांची मागणी देखील अक्षय याने परेश रावल यांच्याकडे केली आहे.
परेश रावल यांनी गेल्या आठवड्यात माध्यमांना सांगितलं होतं की, ते आता कल्ट कॉमेडी करणार नाही. परेश रावल यांनी ‘हेरा फेरी 2’ सिनेमा करण्यास नकार दिल्यामुळे चाहत्यांमध्ये निराशेची लाट पसरली आहे.
सांगायचं झालं तर, सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यंदाच्या वर्षी सिनेमाची शुटिंग सुरु केली. अक्षय सिनेमाचा निर्माता देखील आहे. खिलाडी कुमारने सिनेमाचे राइट्स फिरोज नाडियाडवाला यांच्याकडून कायदेशीर रित्या खरेदी केले आहेत.
परेश रावल यांनी असेही म्हटले की त्यांच्या निर्णयामागे सर्जनशीलता किंवा पैशाचा अभाव हे कारण नव्हतं. सूत्रांचं म्हणणं आहे की, सिनेमासाठी त्यांनी त्यांच्या सामान्य मानधनापेक्षा तिप्पट जास्त मानधन दिले जात आहे. तर पैसा खर्च करण्याआधी परेश रावल यांनी नकार कळलायला हवा होता.. असं देखील अनेकांचे म्हणणं आहे.
अक्षय कुमारच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने इंडस्ट्रीतील एखाद्या सहकलाकारावर अव्यावसायिक वर्तनाचा दावा दाखल केला आहे. परेश रावल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्यासाठी हे नवीन नाही. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड 2’ सिनेमासाठी देखील परेश रावल यांनी नका दिला होता. ‘ओह माय गॉड 2’ सिनेमाची कथा आवडली नसल्यामुळे परेश रावल यांनी सिनेमा करण्यास नकार दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List