मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, जगबुडी नदीत कार कोसळून पाच जण ठार; अंत्यविधीसाठी जाणाऱ्या मीरारोडच्या कुटुंबावर काळाचा घाला

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, जगबुडी नदीत कार कोसळून पाच जण ठार; अंत्यविधीसाठी जाणाऱ्या मीरारोडच्या कुटुंबावर काळाचा घाला

मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाची कार दीडशे फूट खोल नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत विवेक मोरे यांच्या कुटुंबावर काळाचा घाला पडला.

मीरा रोड येथील विवेक मोरे यांच्या देवरुखमध्ये राहणाऱ्या सासऱ्यांचे  निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण कुटुंब मुंबईहून कारने देवरुखकडे निघाले होते. भरणे जगबुडी पुलावरून उतरत असताना चालकाचे कारच्या वेगावरील नियंत्रण सुटले आणि गाडी दोन ब्रिजमधील तुटलेल्या कठडय़ामधून थेट 150 फूट खोल नदीपात्रात कोसळली. या वेळी सर्वजण झोपेत होते.  या अपघातात विवेक मोरे यांची पत्नी मिताली मोरे, मुलगा निहार मोरे व नातेवाईक श्रेयस सावंत, मेघा पराडकर आणि सौरभ पराडकर यांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने अपघातात विवेक मोरे व स्वप्नील हे दोघे बचावले आहेत. यात स्वप्नीलला गंभीर दुखापत झाली असून जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कलंबनी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते बुरहान टाके, मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, प्रतीक जाधव, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे सहकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी औटी, पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनीदेखील  घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले. व्रेनच्या सहाय्याने नदीपात्रात कोसळलेली गाडी बाहेर काढणत आली. अथक प्रयत्नांनंतर गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात कोरोनासदृश्य स्थिती, काळजी घेण्याचे आरोग्यमंत्र्याचे आदेश राज्यात कोरोनासदृश्य स्थिती, काळजी घेण्याचे आरोग्यमंत्र्याचे आदेश
सिंगापूर आणि हाँगकाँग इतर देशात कोरोनाच्या केसेस पुन्हा आढळल्या आहेत. आता राज्यातही सावधानता बाळगण्याची सूचना जारी झाल्या आहेत. कोरोनामुळे २५७...
जनतेला 35 लाख घरांची लॉटरी; नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी, दोन नवीन धरणं नवी मुंबईची तहान भागवणार, महत्त्वाचे निर्णय काय?
सलमान खानची आई आणि सावत्र आई यांच्यात वयाचं अंतर किती?
दातांच्या समस्येचा रामबाण उपाय म्हणजे दंतकांती, दुसऱ्या टूथपेस्टपेक्षा फायदेशीर का ?
भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंबा खाण्याच्या ‘या’ आहेत अनोख्या पद्धती
मुंबईकरांची की कंत्राटदारांची, सरकार कोणाची सेवा करत आहे? आदित्य ठाकरे यांचा सवाल
जूनमध्ये भटकंतीसाठी राजस्थानमधील ही ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट