24 एप्रिलच्या घटनेचा 18 मे रोजी गुन्हा दाखल; विसावा उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकाच्या चौथऱ्यावर वाढदिवसाची पार्टी प्रकरण

24 एप्रिलच्या घटनेचा 18 मे रोजी गुन्हा दाखल; विसावा उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकाच्या चौथऱ्यावर वाढदिवसाची पार्टी प्रकरण

माता गुजरीजी विसावा उद्यान येथे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्थळी वाढदिवसाची पार्टी करून त्याठिकाणी बिर्याणी, दारू, केक याचा पसारा करून मुक्तिसंग्राम स्मारकाची विटंबना करण्यात आली होती. 24 एप्रिल रोजी झालेल्या या घटनेसंदर्भात अखेर 18 मे रोजी शिवाजीनगर पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

24 एप्रिल रोजी माता गुजरीजी विसावा उद्यानात रात्री वाढदिवसाची पार्टी करत काही जणांनी धुडगूस घातला. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे स्मारक असलेल्या चौथऱ्यावर व बाजूला केक, बिर्याणीचे जेवण व दारूच्या बाटल्या त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. घडलेला प्रकार गंभीर असल्याने दैनिक सामनाने यावर आवाज उठविला होता. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची कविता लिहिणाऱ्या प्राचार्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनीही याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 24 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे हे रजेवर असल्याने हे प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आले. पालकमंत्र्यांनी 1 मे रोजी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांना याबाबत सक्त आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली.

उद्यान पर्यवेक्षक विलास कोंडीबा महाबळे यांचाही जबाब नोंदविण्यात आला. हा प्रकार गंभीर असल्याने अखेर तब्बल २४ दिवसांनी शिवाजीनगर पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपण केल्याबद्दल तसेच सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याबद्दल प्रतिबंधक अधिनियम 1995 च्या कलम 3 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पार्टी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येईल, असे शिवाजीनगर पोलिसांनी कळविले आहे. दरम्यान माता गुजरीजी विसावा उद्यानात आता कुठलीही वाढदिवसाची पार्टी किंवा डब्बा पार्टी करता येणार नाही. उद्यानात येणाऱ्या प्रत्येकाची बॅग तपासण्यात येत असून, अशा प्रकाराला प्रतिबंध घालण्यात आल्याचे महापालिकेने कळविले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. त्यातच आता हे युद्ध थांबवल्याबाबत नोबेल पारितोषिक मिळावे,...
शिंदेंची ओळख लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री; संजय राऊत यांचा सणसणीत टोला, अमित शहांवरही घणाघात
चंद्रपूर जिल्ह्यात 49 हजार हेक्टरवरच पेरणी, पावसाचा पत्ता नाही; कापूस सोयाबीन लागवडीचे वेळापत्रकच बिघडले
Iran Earthquake- इस्रायलचा हल्ला की इराणची अणुचाचणी? भूकंप नेमका कशामुळे झाला, तर्कवितर्क सुरू
एअर इंडियाच्या विमान अपघाताचं गूढ उकलेना; 9 कोटी खर्च करून उभारलेल्या लॅबमध्ये ‘ब्लॅक बॉक्स’मधील डेटाच रिकव्हर होईना
इंटेल कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना काढणार, आधीच नोकऱ्यांची बोंबाबोंब, त्यात कर्मचारी कपात
हिंदुस्थानात बनवणार फाल्कन 2000 जेट, मेक इन इंडिया मोहिमेला पाठबळ