छगन भुजबळ मंगळवारी घेणार मंत्रिपदाची शपथ, अन्न व नागरी पुरवठा खात्याची मिळणार जबाबदारी?
एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असं वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिलं आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती.
दरम्यान, बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. आता याच खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांना दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List