हवेशीर बाल्कनी, एक अख्खी भिंत अवॉर्ड्सने भरलेली; बॉलिवूड अभिनेता विजय वर्माचं नवं घर आतून फारच सुंदर, इंटेरिअर अगदीच खास
आज काल अनेक सेलिब्रिटी त्यांच्या स्वप्नातलं घरं घेताना दिसत आहेत. आपापल्या पद्धतीने आपल्या घराला आकार देत आहेत. त्यात आता बॉलिवूड अभिनेता विजय वर्माचं देखील नाव अॅड झालं आहे. विजय वर्मानं देखील त्याचं 'ड्रीम होम' घेतलं आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विजय वर्माचं घर आतून खूपच सुंदर आहे. फराह खानने तिच्या व्लॉगमध्ये अभिनेत्याचे घर दाखवलं आहे.
हा विजय वर्माच्या घराचा हॉल आहे ज्याला मोठी बाल्कनी देखील जोडलेली आहे. बाहेरून थंड हवा घरात येते. हा अभिनेत्याच्या घराचा सर्वात खास भाग आहे. येथे तो त्याच्या मित्रांसोबतही वेळ घालवतो.
विजय वर्माच्या हॉलमध्ये असलेल्या फर्निचरची रचना देखील साधी-सिंपल पण भावनारी आहे. अभिनेत्याने फॅन्सी वस्तू वापरल्या नाहीत. घर साध्या गोष्टींनी सजवलं आहे.
विजय वर्माच्या नवीन घरातील हे स्वयंपाकघर आहे. हे मॉड्यूलर किचन आहे. किचनला बाल्कनी देखील जोडलेली. इथेच फराह आणि दिलीप यांनी त्यांच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवला होता
विजयच्या घराचा हा डायनिंग एरिआ आहे. जिथे त्याने टेबल आणि खुर्च्या ठेवल्या आहेत. इथे कोणत्याही फॅन्सी वस्तू नाहीत. घर फक्त सुंदर लाईट्सने चमकत आहे.
ही टीव्ही रूम आहे. तो जेव्हा घरी असतो तेव्हा तो त्याचा बहुतेक वेळ काहीतरी खास पाहण्यात घालवतो. त्याने या खोलीत म्यूजिक सिस्टम आणि प्लांट्स देखील बसवल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List