अंघोळ नेमकी कधी करायला हवी सकाळी की संध्याकाळी? वाचा सविस्तर
अंघोळ हा प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे आपल्या शरीरातील घाण काढून टाकली जात नाही तर, अंघोळीचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात लोक दिवसातून दोनदा आंघोळ करतात. काही लोकांना सकाळी अंघोळ करायला आवडते तर काहींना संध्याकाळी अंघोळ करायला आवडते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळी अंघोळ करणे जास्त फायदेशीर आहे की संध्याकाळी? तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर, योग्य वेळी आंघोळ करण्याचे फायदे काय आहेत आणि तुमच्यासाठी आंघोळीसाठी योग्य वेळ कोणती असेल? तसेच, आंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? या बद्दल जाणून घेऊ सविस्तर
सकाळी अंघोळ करण्याचे फायदे :
दिवसभर उत्साही राहण्यास मदत होते
सकाळी अंघोळ केल्याने शरीराला एक वेगळीच ऊर्जा मिळते. यामुळे मन आणि शरीर दोन्ही शांत होते. आपण सकाळी थंड पाण्याने आंघोळ केली तर रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर
सकाळी अंघोळ केल्याने त्वचा ताजीतवानी होते. यामुळे त्वचेचे छिद्र उघडतात, यामुळे त्वचा स्वच्छ, निरोगी आणि ताजी-तवानी राहण्यास मदत होते. सकाळी अंघोळ केल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारते
सकाळी अंघोळ केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील रक्तवाहिन्यांची गती वाढते. यामुळे पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यास मदत होते. पांढऱ्या रक्तपेशी शरीराला रोगांशी लढण्यास मदत करतात.
संध्याकाळी अंघोळ करण्याचे फायदे :
आराम देते आणि ताण कमी करते
संध्याकाळी अंघोळ केल्याने संपूर्ण दिवसाचा थकवा दूर होतो. त्यामुळे ताणतणावही कमी होतो आणि रात्री चांगली झोप येते. तसेच शरीर हलके वाटते.
त्वचेतील घाण साफ होते
दिवसभर बाहेर राहिल्याने किंवा काम केल्याने त्वचा खूप घाणेरडी आणि अस्वच्छ होते. म्हणूनच संध्याकाळी अंघोळ केल्याने दिवसभरातील सर्व धूळ, घाण, घाम आणि इतर घाण निघून जाते.
चांगली झोप येते
संध्याकाळी अंघोळ केल्याने शरीराचा सर्व थकवा दूर होतो आणि शरीराला आराम मिळतो. यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.
अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवा :
-
तुम्ही सकाळी अंघोळ करत असाल तर सूर्यस्नान करू नका कारण त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.
-
गरम पाण्याने अंघोळ केल्याने आपल्याला आराम मिळू शकतो. परंतु खूप गरम पाण्याने आंघोळ करणे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असू शकते.
-
अंघोळ केल्यानंतर, आपली त्वचा पूर्णपणे कोरडी करा आणि लोशन किंवा मॉइश्चरायझर लावा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List