राज्यात कोरोनासदृश्य स्थिती, काळजी घेण्याचे आरोग्यमंत्र्याचे आदेश
सिंगापूर आणि हाँगकाँग इतर देशात कोरोनाच्या केसेस पुन्हा आढळल्या आहेत. आता राज्यातही सावधानता बाळगण्याची सूचना जारी झाल्या आहेत. कोरोनामुळे २५७ केसेस जगभरात पुन्हा आढळल्या आहेत.मुंबईतही कोरोनाच्या केसेस आढळल्या आहेत.मुंबई महानगरापालिकेच्या आकडेवारीनुसार 53 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहे. तसेच कोरोनाच्या संक्रमनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती यापूर्वीपासूनच गंभीर होती. त्यातील एकाला कर्करोगाचा आजार होता तर दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम होते. हे दोन्ही रुग्ण मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल होते.
हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन आशियाई देशांमध्ये कोरोना विषाणूच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. सिंगापूरमध्ये रुग्णांच्या संख्येत २८% वाढ झाली आहे, तर हाँगकाँगमध्ये फक्त एका आठवड्यात ३१ गंभीर रुग्णांची नोंद झाली आहे. कोविड-१९ च्या रुग्णांची अंदाजे संख्या १४,२०० पर्यंत वाढल्याने सिंगापूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येतही सुमारे ३०% वाढ झाली. मुंबईतही ५३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे साथीची स्थिती असल्याची कबूली राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List