भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंबा खाण्याच्या ‘या’ आहेत अनोख्या पद्धती

भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंबा खाण्याच्या ‘या’ आहेत अनोख्या पद्धती

उन्हाळा म्हटंल की आंबा हा सर्वांच आठवतो. अशातच लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळयांच आंबा खायला आवडतो. कवचितच असे असतील ज्यांना आंबा आवडत नाही. तसेच आंबा हा वेगवेगळ्या प्रकारे खाल्ला जाते. मँगो मिल्क शेक सारखे काही पेय त्यापासून बनवले जातात. तर या आंब्यामध्ये फायबर, पोटॅशियम, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन सी आणि ए सारखे पोषक घटक आढळतात, त्यामुळे ते एकुणच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तुम्हाला माहित आहे का की, आपल्या भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी संस्कृती, अन्न, कपडे, भाषा, चालीरिती आणि सण आहेत. बहुतेक लोकांचे स्वतःचे कपडे आणि खाण्याच्या सवयी असतात. पंजाबमधील मोहरीच्या भाजी आणि मक्याच्या रोटीप्रमाणे, इडली डोसा दक्षिणेत खूप लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे, आंबा खाण्याच्या पद्धती देखील प्रत्येक राज्यानुसार बदलतात. प्रत्येक राज्यात आंबा खाण्याची खास पद्धत काय आहे तर ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

आंब्याचा रस पुरी

महाराष्ट्रात आंब्यापासून आमरस तयार करून पुरी सोबत खाणे खूप लोकप्रिय आहे. यामध्ये आंब्यांच्या गर काढून त्यात मीठ, साखर, दूध, जायफळ आणि हिरवी वेलची घालून पेस्ट बनवली जाते. ज्याला आमरस म्हणतात. तयार आमरस पुरीसोबत खाल्ले जाते, जे खूप चविष्ट असते.

कच्च्या कैरीचे भात

कर्नाटकात कच्च्या कैरीचे भात खूप लोकप्रिय आहे. हे आंबट कच्ची कैरी, मसाले वापरून शिजवलेल्या भातापासून बनवले जाते. दक्षिणेत, लोकं उन्हाळ्याच्या हंगामात ही डिश मोठ्या आवडीने खातात. हे खूप चविष्ट आहे.

आंबा कलाकंद

आंब्यापासून बनवलेला आंबा कलाकंद राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हा एक खास प्रकारचा गोड पदार्थ आहे जो आंबा आणि मावा किंवा खव्यापासून बनवला जातो. ते बनवण्यासाठी आंब्याची प्युरी, मावा, साखर आणि वेलची वापरली जाते. ते सहज तयार केले जाते.

आंबा करी

गुजरातमध्ये लोकांना आंब्याची करी बनवून खायला आवडते. हा दक्षिण आणि पश्चिम भारतातील एक खास पारंपारिक पदार्थ आहे जो चवीला गोड आणि आंबट असतो. जर ते कच्च्या आंब्यापासून बनवले तर ते आंबट होते. पिकलेल्या आंब्यापासून बनवलेली करी थोडी जास्त गोड असते.

मँगो डोई

आम दोई बंगालमध्ये प्रसिद्ध आहे, जी “मिष्टी दोई” गोड दही आणि पिकलेल्या आंब्याच्या चवीचे एक अद्भुत मिश्रण आहे. मँगो डोई बनवल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवले जाते आणि थंड झाल्यावर सर्व्ह केले जाते. ते बनवायलाही खूप सोपे आहे. तसेच, उन्हाळ्यात थंड मँगोची डोई खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो.

स्टफ्ड आंबा कुल्फी

स्टफ्ड आंबा कुल्फी दिल्लीत खूप प्रसिद्ध आहे. हे करण्यासाठी आंब्याच्या आतून कडक बाठा बाहेर काढला जातो आणि कुल्फीने भरला जातो. गोठवल्यानंतर, जेव्हा आंबा गोल आकारात कापला जातो तेव्हा तो आतून क्रिमी कुल्फी बनतो आणि बाहेरून त्यावर आंब्याचा गराने सर्व्ह केले जाते. जो खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो. ते खूप चविष्ट आहे.

आंब्याची डाळ

तेलंगणामध्येही आंब्याची डाळ बनवली जाते. कच्च्या कैरीपासून आंबटपणा आणि डाळीचा किंचित गोड आणि तिखट चव मिळून एक अतिशय चविष्ट पदार्थ बनतो. ही डाळ आंबट, मसालेदार आणि किंचित गोड आहे, जी विशेषतः उन्हाळ्यात ताजेतवाने होण्यास मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – चेन्नईचा पुन्हा एकदा पराभव, राजस्थानने 6 विकेटने जिंकला सामना IPL 2025 – चेन्नईचा पुन्हा एकदा पराभव, राजस्थानने 6 विकेटने जिंकला सामना
आयपीएलमधून बाहेर फेकल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी...
सरकारी कोट्यातील घराचे आमीष दाखवून 24 कोटींची फसवणूक, पुरूषोत्तम चव्हाण याला अटक
मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज काय?
Mumbai rain : पहिल्याच पावसाने मुंबई लोकलला फटका आणि उपनगरात दाणादाण, कोकण रेल्वे मार्गावर झाड कोसळले
संजय राऊतांचा संपादकीय बॉम्ब, भुजबळांच्या मंत्रि‍पदावर चार शब्दांचं ट्विट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
आंबेगाव तालुक्यात पावसाने थैमान, महाळूंगे पडवळ येथे कांद्याच्या बराखीवर वीज पडून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान
पुण्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग कोसळले, 7 ते 8 दुचाकींचे नुकसान