डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाल्याचा अभिनेत्रीचा आरोप, म्हणाली ’15 दिवसांपासून आत विष घेऊन फिरत होते’
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी मातृत्वाचा अनुभव घेतला आहे. मात्र एका अभिनेत्रीने तिला आलेला एक वाईट अनुभव सांगिला आहे. तिने तिच्या गर्भपाताबद्दल सांगत तिला आलेला एक भयानक अनुभव सांगितला. पण तिने असही सांगितलं की यात डॉक्टरांची चूक होती. ही अभिनेत्री म्हणजे संभावना सेठ. यूट्यूब व्लॉग्सद्वारे ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. ती चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील दररोज अपडेट्स देत असते. तिने चाहत्यांना याबद्दल अनेकदा सांगितले आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या गर्भपातासाठी आयव्हीएफ डॉक्टरांना जबाबदार धरले. 2024 पासून संभावना आणि तिचा नवरा आई-बाबा होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जेव्हा संभावना पहिल्यांदा गर्भवती राहिली तेव्हा तीन महिन्यांत तिचा गर्भपात झाला.
डॉक्टरांना जबाबदार धरण्यात आले
एका मुलाखतीत संभावनाने तिच्या गर्भपाताबद्दल सांगितले. तिने सांगितले की तिने बेबी बंपसोबत तिचे फोटो सेशनही केले होते. तिसऱ्या महिन्याच्या स्कॅनमध्ये ती तिच्या गरोदरपणाची घोषणाही करणार होती. पण जेव्हा तिला गर्भपात झाल्याचं समजलं. तेव्हा तिला धक्काच बसला. ती म्हणाली की डॉक्टरांची चूक होती कारण ती म्हणत होती की तिला खूप वेदना होत आहेत तेव्हा त्यांनी तपासणी केली नाही. संभावना म्हणाली “जेव्हा तुम्ही गर्भ ट्रांसफर करतात तेव्हा त्यापूर्वी अनुवांशिक चाचणी केली जाते, डॉक्टरांनी ती केली नाही. मुळात ते गर्भ जेनेटिकली अॅबनॉर्मल होता. जर मला हे पाचव्या महिन्यात कळलं असते तर काय झालं असतं याची कल्पना करा.”
‘मी 15 दिवस विष घेऊन फिरत होते…’
संभावना पुढे म्हणाली, “तुम्ही कल्पना करू शकता की मी तिसऱ्या महिन्यात स्कॅनसाठी गेले होते आणि नंतर मला कळले की सर्व काही 15 दिवसांपूर्वी संपले आहे. म्हणून 15 दिवस मी माझ्या आत विष घेऊन फिरत होते. मला काहीही होऊ शकलं असतं. आणि अनेक दिवसांपासून मी म्हणत होते की मला खूप वेदना होत आहेत. आणि माझे डॉक्टर म्हणत होते की ‘हा तुमचा संधिवात आहे.” संभावना म्हणाली, “डॉक्टर म्हणाले संभावना, तुम्हाला आधीच संधिवात होता. तर, माफ करा,’ असं डॉक्टरांनी म्हटल्याचं तिने सांगितलं. पण ती नक्कीच या धक्क्यातून सावरली आहे. आणि पुन्हा प्रयत्न करणार असल्याचं तिने म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List