सुट्टय़ा रद्द; डय़ुटीवर जाणाऱ्या जवानाकडे मागितली लाच
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करातील जवानांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्वाल्हेर येथून डय़ुटी जॉईन करण्यासाठी जम्मूला निघालेल्या जवानाकडून टीटीईने ट्रेनमध्येच लाच मागितली. याबाबतचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होताच संबंधित टीटीईचे निलंबन करण्यात आले आहे. ग्वाल्हेरला राहणारे सुभेदार विनोद कुमार दुबे यांच्याकडे टीटीईने लाच मागितली. माळवा एक्स्प्रेसमध्ये टीटीईने त्यांच्याकडून आणि त्यांचे सहकारी अग्निवीर यांच्याकडून लाच मागितली. ट्रेनमध्ये याप्रकरणी बाचाबाची करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी टीटीई व्हिडीओ बनवण्यासाठी मनाई करताना दिसत आहे. दलजित सिंह असे या टीटीईचे नाव असून तो लुधियाना डिव्हिजनमध्ये तैनात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List