महाबळेश्वर येथे विहिरीत सापडला ऐतिहासिक ठेवा, दुर्मिळ तलवारींसह इतर शस्त्रास्त्रांचा समावेश

महाबळेश्वर येथे विहिरीत सापडला ऐतिहासिक ठेवा, दुर्मिळ तलवारींसह इतर शस्त्रास्त्रांचा समावेश

ब्रिटिशांच्या नजरेत येऊ नये म्हणून विहिरीत लपवलेली ऐतिहासिक व पुरातन शस्त्र आज श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील एका कोरड्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली. त्याची पाहणी करून ती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत पुरातत्व खात्याच्या ताब्यात देण्यात आली.

श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वास्तूंचा अभ्यास करत असताना फलटणचे इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना दि. 3 मे रोजी एका जुन्या विहिरीमध्ये ‘मराठा धोप’ या प्रकारच्या तलवारीची मूठ व इतर पुरातन वस्तू निदर्शनास आल्या. ऐतिहासिकदृष्टय़ा ‘मराठा धोप’ या पद्धतीच्या तलवारी खूप दुर्मिळ व अमूल्य आहेत. इंडियन आर्म अॅक्ट नंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्र जप्त करून नष्ट केली. त्यातून वाचलेली शस्त्र अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगप्रसिद्ध जगदंबा व भवानी तलवारी या प्रकारच्या आहेत. मराठा युद्धनीती व शस्त्र्ाांचा अभ्यास करून धोप तलवारी बनवल्या. या तलवारींसाठी फ्रेंच, पोर्तुगीज या देशांतील बनावटीचे पाते वापरत असल्यामुळे यांना फिरंगीदेखील म्हणत असत. हे पोलाद उत्पृष्ट दर्जाचे असे. या तलवारींचे दोन उपप्रकार आहेत. पहिला प्रकार वक्र धोप, याच्या पात्याच्या टोकाचा पिपळा भाग थोडा वक्र असतो.

दुसऱ्या सरळ धोप तलवारीचे पाते सरळ असते. अशा तलवारी घोडदळासाठी वापरल्या जात असत. याची लांबी 4 फूट असते. शत्रूला भोकसण्यासाठी हे शस्त्र्ा वापरले जाते. या फिरंगी पात्यांना मराठय़ांनी युद्धामध्ये जास्त काळ टिकण्यासाठी व हाताला इजा न करणारी मूठ बनवली व याचा समतोल उत्तम केला.

ही ऐतिहासिक ठेव दुर्मिळ आहे, हे लक्षात येताच, राहुल कदम यांनी तत्काळ ही माहिती गावातील काही प्रमुख व्यक्तींना दिली. धनेश वाडेकर यांनी याची कल्पना वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांना दिली. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्यासह युवाराज्य फाऊंडेशन सातारा अध्यक्ष महारूद्र तिपुंडे, सुभाष गायकवाड, रोहन ढाणे यांचे पथक साताऱ्याहून श्री क्षेत्र महाबळेश्वरला आले. त्यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या साहाय्याने ट्रेकर्स जयवंत बिरामणे आणि अनिल लांगी यांनी या ऐतिहासिक वस्तू विहिरीतून वर काढल्या.

अशा ऐतिहासिक वस्तूंच्या माध्यमातून इतिहासाची अनेक दडलेली पाने उघडली जाऊ शकतात, असा विश्वास अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रशांत कात्रट, नीलेश धनावडे, आनंद ढेबे, महेश लांगी, संकेत लांगी हे स्थानिक उपस्थित होते.

मराठ्यांनी बनवलेल्या मुठीची माहिती

नख्या मूठ व म्यान पाते जोडण्यासाठी येथे रॅबिट मारले जाई. म्यान येथपर्यंत बसत.

ठोला तलवारीवरती येणारे वार हातावर येऊ नये म्हणून अडवणारा भाग.

परज मुठीसमोर बोटांचे संरक्षण करणारा भाग.

कटोरी मुठीखालील भाग अत्यंत वक्र खोलगट असतो, यामुळे तलवार जास्त काळ चालवली तरी रुतत नसे.

गज – या मराठा मुठींचे वैशिष्टय़ म्हणजे मुठीपासून खाली 7 इंच लांब व थोडा वक्र टोकदार भाग म्हणजे गज. यामुळे तलवारीच्या वजनाचा समतोल सहज होतो. तसेच मोगरा, कंगणी, जनेऊ, कंठी, कडी, चौक असे अनेक मुठीचे भाग असतात, अशी माहिती अभ्यासक मयुरेश मोरे यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नागरी लष्करी समन्वयाबाबत फडणवीसांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक नागरी लष्करी समन्वयाबाबत फडणवीसांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक
नागरी लष्करी समन्वयाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित...
मित्राच्या मेहंदी कार्यक्रमात ‘कांतारा’ फेम अभिनेत्याचं निधन; 33 व्या वर्षी आला हार्ट अटॅक
अमिताभ यांचा 36 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन; जया बच्चन यांनी संतापून घेतला होता हा निर्णय
‘माझे वडील बेबोसोबत जास्त आनंदी…; सैफ अली खानचा लेक इब्राहिम थेटच म्हणाला
weightloss tips: वजन कमी करताना ‘या’ फळांचे चुकूनही सेवन करू नये, लठ्ठपणा दूर होण्याऐवजी…..
‘मुरांबा’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री होणार एण्ट्री; पहिल्यांदा दिसणार मेडिटेशन हीलरच्या भूमिकेत
टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच पत्नी अनुष्कासोबत विमानतळावर दिसला विराट; नेटकरी म्हणाले ‘वहिनी थांबवा..’