दहशतवाद्यांना ट्रेनिंग, 26/11, पुलवामा हल्ला करूनही निर्दोष असल्याचा कांगावा… पाकिस्तानी माहिरा खानला अभिनेत्रीने झापलं !
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण असून दोन्ही देशांसाठी ती परिस्थिती खूप वाईट आहे. या तणावाचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहेच, तसेच यामुळे चित्रपट जगतातील स्टार्समध्येही वादविवाद पाहायला मिळत आहेत. या मुद्यावरून सोशल मीडियाद्वारे अनेक स्टार्सनी आपापली मतं मांडली आहेत. तर नुकतीच टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव असलेल्या आशी सिंगनेही पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला चोख उत्तर दिले आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर टीका केली होती, ज्यावर आशीने तिला पाकच्या काळ्या कृत्यांची आठवण करून देत चांगलेच खडेबोल सुनावलेत.
22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यादरम्यान, पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी आपला संताप व्यक्त केला होता. यादचरम्यान पाक अभिनेत्री माहिरा खानने ऑपरेशन सिंदूरला भ्याड म्हटलं, इतकेच नव्हे तर द्वेष पसरवण्यासाठी काही विधानांचा वापर केल्याचा आरोप अभिनेत्रीने भारतावर केला.
आशीने दिलं चोख प्रत्युत्तर
भारताच्या प्रतिहल्ल्यावर माहिरा खानने टीका केली होती. तुम्ही मध्यरात्री शहरांवर हल्ला करता आणि त्याला विजय म्हणता? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत, असा आरोपही तिने केला होता. मात्र माहिरा खानच्या कांगाव्यानंतर आशी सिंहने तिला चोख प्रत्युत्तर दिलं. ज्या देशाने ओसामा बिन लादेनला आसरा दिला, कँप्समध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि 26/11, कारगिल, पुलवामा घडूनही स्वत:ला निर्दोष म्हणवतात, ही खूपच मोठी गोष्ट आहे, असं म्हणत आशीने तिला झापलं.
ट्रोलर्सनाही दिलं उत्तर
एवढेच नाही तर आशी पुढे म्हणाली की, ” आम्हाला लेक्चरपासूनदूर ठेवा आणि तुमच्या देशाला काही समंजस प्रश्न विचारा, जिथे तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता. भारत युद्ध साजरा करत नाही, चिथावणी दिल्यावर आम्ही प्रत्युत्तर देतो, जय हिंद” असंही तिने नमूद केलं. माहिराला काही शब्द सुनावल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक लोकांनी आशीवर टीका केली, तिला ट्रोल केलं, पण आशीने त्यांच्याकडे लक्ष न देता, त्यांनाही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानी चाहत्यांनो, तुमचा प्रेमळ मेसेज मिळाला, अशा खोचक शब्दात तिने रिप्लाय दिला.गुगल करा आणि भारत-पाकिस्तानच्या युद्धाबद्दल माहिती जाणून घ्या, असा सल्लाही तिने दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List