जुलैमध्ये म्हाडाची चार हजार घरांसाठी लॉटरी; ठाणे, कल्याणमध्ये सर्वाधिक घरे

जुलैमध्ये म्हाडाची चार हजार घरांसाठी लॉटरी; ठाणे, कल्याणमध्ये सर्वाधिक घरे

येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईतील पाच हजार घरांसाठी लॉटरी येणार आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे. यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

म्हाडातर्फे दरवर्षी राज्यात सुमारे 30 हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे. त्यानुसार दर तीन ते चार महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या मंडळाची लॉटरी निघणार आहे. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाने तीन लॉटरी काढल्या असून सुमारे दहा हजार जणांचे घराचे स्वप्न साकार केले आहे. आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा सुमारे चार हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी कोकण मंडळाने सुरू केली आहे. यात म्हाडाने स्वतः चितळसर येथे उभारलेल्या 1173 घरांसह हाऊसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचादेखील समावेश असणार आहे. कल्याण येथे एकाच खासगी विकासकाकडून म्हाडाला अडीच हजार घरे उपलब्ध होणार असून यांचादेखील लॉटरीमध्ये समावेश केला जाणार आहे.

चितळसर येथील घरांचा पाण्याचा प्रश्न सुटला
चितळसर येथे म्हाडाने 22 मजली सात इमारती उभारल्या असून येथील पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप या इमारतींना ओसी मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर म्हाडा आणि ठाणे महापालिका अधिकाऱयांची नुकतीच बैठक झाली असून सदर प्रकल्पासाठी ‘अमृत’ योजनेंतर्गत महापालिका पाण्याची टाकी बांधणार आहे. तोपर्यंत येथील घरांना पाणीपुरवठा करण्यासाठी तात्पुरती जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यानंतर ओसी मिळताच येथील घरांचा लॉटरीमध्ये समावेश केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;