मिनीबसची ट्रकला धडक;  दोन ठार, 8 जण जखमी, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

मिनीबसची ट्रकला धडक;  दोन ठार, 8 जण जखमी, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

इचलकरंजीहून उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रव्हलर मिनी बसला सातारा जिह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 2 ठार, तर 8 जखमी झाले. सातारा-लोणंद मार्गावर सालपे गावाजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास या भरधाव मिनीबसची मालट्रकशी टक्कर होऊन हा अपघात झाला.

मिनीबस चालक सलमान इम्तियाज सय्यद (24, रा. पाटील गल्ली, गणेशनगर, शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) व रजनी संजय दुर्गुळे (48, रा. पेठ वडगाव, ता. हातकलंगले, जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.

इचलकरंजी येथील ट्रव्हलर मिनीबसमधून भाविक महिला उज्जैन येथे देवदर्शनास निघाल्या होत्या. ही बस रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास सातारा जिह्यातील वाठार स्टेशनमार्गे सालपे घाट उतरून लोणंदच्या दिशेने जात होती. त्याचवेळी लोणंदकडून साताराकडे येत असलेला ट्रक सालपे गावाजवळील एका वळणावर समोर आला. दोन्ही वाहनांची धडक होऊन हा भीषण अपघात झाला.

सालपे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत केली. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या अपघातात मिनी बसचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले..

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;