दहशतवादी मोकाट मग शस्त्रसंधी का केली? अख्ख्या देशाचा मोदी सरकारला सवाल
हिंदुस्थान आणि पाकिस्तान संघर्षात डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करणारे कोण? पहलगाम हल्ल्यासह विविध दहशतवादी कारवायांमधील दहशतवादी अजूनही मोकाटच आहेत, त्यांचा खात्मा करण्यात किंवा त्यांना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही, मग शस्त्रसंधी का मान्य केली, आपण नेमके काय साध्य केले, अशा प्रश्नांचा भडिमार लष्कराचे माजी अधिकारी आणि देशभरातील सामान्य जनता मोदी सरकारला विचारत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. हा हिंदुस्थानवरचा आघात असताना मोदी सरकारने ट्रम्प यांना नाक का खुपसू दिले, असा सवाल काही निवृत्त अधिकाऱ्यांनी दिला.
आम्ही पीडित होतो. आम्ही खूप विचारपूर्वक उत्तर दिले आणि कोणत्याही सामान्याला इजा होणार नाही याची काळजी घेतली. आम्ही दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. परंतु, हिंदुस्थानने अधिकृत माहिती देण्यापूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी शस्त्रसंधी घोषित केली, हे योग्य नाही, अशा शब्दांत विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे.
मोदीभक्त कोमात
शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतरही पाकिस्तानकडून गोळीबार आणि तोफगोळय़ांचा मारा सुरूच आहे. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीबद्दल दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे काwतुक केले आणि कश्मीरप्रश्नी तोडगा काढण्याबद्दलही भाष्य केले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीररीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा ते माध्यमांसमोरही आलेले नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे संभ्रमाचे वातावरण असून मोदीभक्त कोमात गेल्याचे चित्र आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List