महापालिकेपुढे 20 दिवसांत 33 टक्के नालेसफाईचे आव्हान; आतापर्यंत केवळ47 टक्के नालेसफाई पूर्ण
वरुणराजा या वर्षी वेळेवर दाखल होणार असून यंदा 27 मे रोजी केरळमध्ये आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र अजूनही मुंबईची पावसाळय़ापूर्वीच्या नालेसफाईची कामे अपूर्ण आहेत. 31 मेपूर्वी 80 टक्के नालेसफाईचे टार्गेट पूर्ण करायचे असून आतापर्यंत केवळ 47 टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील 20 दिवसांत 33 टक्के नालेसफाईचे आव्हान मुंबई महापालिकेपुढे आहे.
पावसाळय़ापूर्वी होणारी नालेसफाई दीड महिना उशिरा सुरू झाल्यानंतरही तिला अजूनही हवी तशी गती मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी दौरा करून पश्चिम उपनगरातील नालेसफाईचा आढावा घेतला. वाकोला नदी (कनाकिया पूल), एसएनडीटी नाला (गझधरबंध उदंचन केंद्र), ओशिवरा नदी (मालाड), पिरामल नाला (गोरेगाव पश्चिम), रामचंद्र नाला (मालाड पश्चिम) या ठिकाणांसह नदी व नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी बांगर यांनी केली. यावेळी प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
11 मेपर्यंतची सफाई
मुंबई शहर ः 50 टक्के
पूर्व उपनगर ः 68 टक्के
पश्चिम उपनगर ः 66 टक्के
मिठी नदी ः 35 टक्के
छोटे नाले ः 36 टक्के
एकूण ः 47 टक्के
पाणी तुंबण्याची ठिकाणे घटली
मुंबईत गेल्या वर्षभरात पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे विस्तारल्यामुळे तसेच सुधारणा कामांमुळे मुंबईत पाणी तुंबण्याची ठिकाणे कमी झाली आहेत.
पाणी उपशासाठी 417 पंप बसवणार
मुंबईत पाणी तुंबण्याचा धोका लक्षात घेता पावसाचे पाणी उपसा करण्यासाठी 417 पंप बसवण्यात येणार आहेत. डिझेल जनरेटर संच आणि फिरते उदंचन पंपदेखील सज्ज ठेवावी, पाणी साचण्याची ठिकाणे पूरमुक्त करावीत, अशा सूचना देण्यात आली आहेत. गाळ उपसा व गाळ वाहून नेण्यात गैरप्रकार आढळल्यास पंत्राटदार आणि अधिकाऱयावर कडक कारवाई केली जाणार आहे.
गोरेगाव पश्चिमेला बॉक्स पुशिंगचा वापर करा
गोरेगाव पश्चिम येथील ओबेरॉय जंक्शन येथे पाणी साचण्याची समस्या आहे. पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी ‘ओपन कट’ पद्धतीने वाहिनी टाकणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर रस्ता न खोदता, वाहतुकीला अडथळा न आणता ‘बॉक्स पुशिंग’ पद्धतीने ही वाहिनी टाकून पाण्याचा निचरा करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले.
लव्हग्रोव्ह उदंचन पेंद्र नाल्यातील जुना दरवाजा बदला!
वरळी ते हाजी अली परिसर यांच्यादरम्यान असलेल्या लव्हग्रोव्ह उदंचन पेंद्र येथील (एलजीपी) नाल्यातील जुना दरवाजा तत्काळ काढून टाकावा तसेच दादर-धारावी नाल्यातील तरंगता कचरा दररोज काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List