सर्वात मोठा देणगीदार; बिल गेट्स 200 अब्ज डॉलर संपत्ती करणार दान
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी आपली उर्वरित 99 टक्के टेक प्रॉपर्टी गेट्स फाऊंडेशनला दान करण्याची घोषणा नुकतीच केली. याची किंमत अंदाजे 107 अब्ज डॉलर आहे. ही आजवरची सर्वात मोठी देणगी आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची ही देणगी गेट्स फाऊंडेशनला दिली जाणार आहे. यामुळे फाऊंडेशनला पुढील 20 वर्षांत अतिरिक्त 200 अब्ज डॉलर्स खर्च करता येतील.
प्रसिद्ध उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर आणि अँडर्यू कार्नेगी यांच्या ऐतिहासिक योगदानापेक्षा हे दान अधिक आहे. इतकेच नव्हे तर बर्कशायर हॅथवेचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे हे दान केलेल्या रकमेच्या बाबतीत गेट्स यांना मागे टाकू शकतात. वॉरेन बफे यांनी दान देण्याचे वचन दिलेल्या संपत्तीचे सध्याचे मूल्य पर्ह्ब्सने 160 अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
– बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन ही जगातील सर्वात मोठी खासगी धर्मादाय संस्था आहे. या संस्थेची स्थापना 2000 साली बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी केली होती. दारिद्रय़ निर्मूलन, आरोग्य सेवा सुधारणे आणि शिक्षणाला चालना देणे हे या फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही संस्था हिंदुस्थानातही ग्रामीण भागात गरीब, गरजूंसाठी काम करते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List