विदर्भात तापमान पुन्हा 40शी पार
विदर्भाच्या काही भागात तापमानाचा पारा पुन्हा 40 अंश सेल्सिअसवर गेला असला तरीही दुसरीकडे पावसाचा मारा सुरूच असल्याने उकाडयात वाढ झाली आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात वादळी पावसाचा इशारा कायम आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले होते. मात्र, अचानक बदललेल्या वातावरणामुळे आता काही भागांमध्ये उष्णतेचा जोर कमी झाल्याचे जाणवत आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असला तरीही वाऱ्याचा वेग आणि विजांचा कडकडाटामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या काही भागांना मात्र वादळी पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढउतार कायम आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List