भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून पुन्हा जीवे मारण्याची धमकी
Navneet Kaur Rana Death Threats : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली आहे. पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून जीवे मारण्याच्या धमकी त्यांना देण्यात आली आहे. याबद्दल नवनीत राणा यांनी मुंबईच्या खार पोलिसांना माहिती दिली आहे. नवनीत राणा यांना यापूर्वीही पाकिस्तानमधून धमकीचे मेसेज आले आहे.
काय आहे धमकी?
नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या संदेशात म्हटले आहे की, ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान है. जल्दी उडने वाली है.’ पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या नवनीत राणा यांना आल्या आहे. त्यानंतर राणा यांच्याकडून ही माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. नवनीत राणा यांना आलेली ही धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना केंद्रीय यंत्रणेची मदत घ्यावी लागणार आहे.
मागील वर्षी आली होती धमकी
मागील वर्षी नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती. त्यांच्या व्हॉटसअॅप क्रमांकावर क्लिप पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आली आहे. आता पुन्हा राणा यांना धमकी आल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताचे झालेल्या नुकसानबाबत डिवचले होते. त्यांनी दिलेल्या वक्तव्यात म्हटले होती की, ‘घर मे घुसकर मारा है, कबर तुम्हारी खोदी है. देश की गद्दी दिल्ली पर बाप तुम्हारा मोदी बैठा है…क्या बोलते छोटे पाकिस्तान, बकरी की अम्मा कब तक खैर मनायेगी. चुन चुन कर मारेंगे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी धन्यवाद आणि अभिनंदन करते. घर मे घुसके मारेंगे, हे काय असते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List