पाकिस्तान, नको रे बाबा! पुन्हा पाऊलही ठेवणार नाही, डॅरिल मिचेचा निर्णय, टॉम करन तर लहान मुलासारखा रडला

पाकिस्तान, नको रे बाबा! पुन्हा पाऊलही ठेवणार नाही, डॅरिल मिचेचा निर्णय, टॉम करन तर  लहान मुलासारखा रडला

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. या तणावाचा परिणाम क्रिकेटवरही झाला असून आयपीएल 2025 स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आली. तर पाकिस्तानात सुरू असलेली पीएसएलही स्थगित करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पीएसएलसाठी पाकिस्तानात आलेले खेळाडू घाईघाईने मायदेशी परतले आहेत. मायदेशी परतताच या खेळाडूंनी युद्धसदृश परिस्थिती असताना पाकिस्तानातील आपला भयावह अनुभव कथन केला आहे.

पीएसएल स्थगित झाल्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेमध्ये लाहोर कलंदर्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा बांगलादेशचा फिरकीपटू रिशाद हुसैन दुबईला रवाना झाला. दुबईला पोहोचचात त्याने पाकिस्तानातील भयंकर परिस्थिती सांगितली. पीएसएलमध्ये सहभागी झालेले विदेशी खेळाडू प्रचंड घाबरले असून त्यांनी पाकिस्तान सोडून जाण्याचा प्रयत्न केला. काही खेळाडू विमानतळावर लहान मुलासारखे रडत होते, असे रिशादने सांगितले.

इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्स, टॉम करन, डेव्हिड विसे, न्यूझीलंडचा खेळाडू डॅरिल मिशेल, श्रीलंकेचा खेळाडू कुशल परेरा हे सर्वच विदेशी खेळाडू प्रचंड घाबरले होते. दुबई गाठताच मिशेल म्हणाला की, मी पुन्हा पाकिस्तानला कधीच जाणार नाही, असे रिशाद हुसैन याने सांगितले.

काही खेळाडू तर एवढे घाबरले होते की त्यांना रडू कोसळले. इंग्लंडचा खेळाडू टॉम करन लहान मुलासारखा रडला. या कठीण काळात त्यांना सांत्वाना देण्यासाठी, धीर देण्यासाठी काही लोकांची गरज होती. खेळाडूंनी दुबई गाठली आणि तिथून ते मायदेशी परतले, असेही रिशादने स्पष्ट केले.

टॉम करन विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याला समजले की विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यावेळी तो लहान मुलासारखा रडू लागला. त्यावेळी त्याला सांभाळण्यासाठी 2-3 लोकांची गरज होती. आम्ही दुबईत पोहोचलो तेव्हा आम्हाला समजले की आम्ही निघाल्यावर 20 मिनिटांनी विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. ही खुपच भयानक आणि वाईट बातमी होती. दुबई गाठल्यानंतर आम्ही सुटकेचा निश्वास सोडला, असेही रिशादने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्या! मराठीप्रेमींच्या जाहीर सभेत एकमुखी मागणी पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्या! मराठीप्रेमींच्या जाहीर सभेत एकमुखी मागणी
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची किंबहुना तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा महायुती सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि बौद्धिक विकासावर गंभीर परिणाम...
महावितरणकडून ग्राहकांवर अनामत रकमेचा बोजा
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तरपत्रिका तपासायला ‘एआय’ची मदत, हार्वर्ड विद्यापीठातील इनोव्हेशन लॅबचे मिळाले सहकार्य
विदर्भात तापमान पुन्हा 40शी पार
कोकण-मराठवाड्याला वादळी पावसाचा इशारा, ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार
इमारतींचा स्वयंपुनर्विकास मार्गी लावण्यासाठी फायनान्स कॉर्पोरेशनच्या स्थापनेची चाचपणी
देशातील 30 राज्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस, उत्तर प्रदेशात झाडे उन्मळून पडली