देश-धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले – नितीन बानुगडे पाटील

देश-धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले – नितीन बानुगडे पाटील

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसे करावे, याचा वस्तुपाठ शंभुराजे यांनी घालून दिला. 14 मे 1657 रोजी जन्मलेल्या या बाळाचे ‘संभाजीराजे’ असे नामकरण जिजाऊ माँसाहेब यांनी केले होते. दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. ‘स्वराज्यासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाला दाखवले; तर देश-धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले,’ असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.

जय भवानी तरुण मंडळ आयोजित शिव-फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत ‘छत्रपती संभाजी महाराज : धगधगती अंगारगाथा’ या विषयावर प्रा. बानुगडे-पाटील बोलत होते. सागर धुमाळ, भगवान पठारे, नारायण बहिरवाडे, नरेंद्र बनसोडे, आदित्य हजारे, राजू दुर्गे, आयुष निंबारकर, भावेश भोजने, मारुती भापकर उपस्थित होते.

प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले की, ‘आग्रा येथून सुटका करून घेताना शत्रूची दिशाभूल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी शंभुराजे यांचे निधन झाल्याची खोटी वार्ता प्रसूत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोपविलेली प्रत्येक जबाबदारी शंभुराजे यांनी चोखपणे पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभुराजे यांच्या विरोधात कारस्थान रचण्यात आले, परंतु हंबीरराव यांनी ते हाणून पाडले. त्यांच्यावर तीन वेळा विषप्रयोग करण्यात आला.

छत्रपती झाल्यानंतर शंभुराजे यांनी बुऱ्हाणपूर लुटल्यावर शंभुराजे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावर बादशाही पगडी घालणार नाही, अशी प्रतिज्ञा औरंगजेबाने केली; पण ती संधी त्याला मिळाली नाही. दुर्दैवाने परिस्थितीने शंभुराजे यांना साथ दिली नाही; आणि त्यांना कैद झाली. अनन्वित अत्याचार आणि अवहेलना सोसून त्यांनी बलिदान दिले; नाट्य-चित्रपटसृष्टीतून त्यांचा बदनामीकारक इतिहास रंगवला गेला. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्याइतकेच शंभुराजे यांचे चारित्र्य स्वच्छ होते’, असेही त्यांनी सांगितले.

प्रकाश हगवणे, राम नलावडे, शरद थोरात, विक्रम पवार, जितेंद्र छाबडा यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. मारुती भापकर यांनी आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिच्या बोलण्यात इतका द्वेष..; मराठी अभिनेत्याने पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावलं तिच्या बोलण्यात इतका द्वेष..; मराठी अभिनेत्याने पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावलं
भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचं वातावरण असताना आता बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे....
Prateik Babbar On Raj Babbar : प्रतीक बब्बरने वडील राज बब्बर यांना लग्नात का बोलावलं नाही ? 3 महिन्यांनी केला खुलासा
नियंत्रण रेषा आणि सीमावर्ती भागात पहिली शांततेची रात्र, हिंदुस्थानी सैन्याकडून माहिती
Operation Sindoor- दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग, हिंदुस्थान सरकारने केला भंडाफोड
युद्धावर पोस्ट लिहिणारा रणवीर अलाहाबादिया वादात
ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानने असा घेतला फायदा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नाण्याची दुसरी बाजू मांडली
भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून पुन्हा जीवे मारण्याची धमकी