देशातील 30 राज्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस, उत्तर प्रदेशात झाडे उन्मळून पडली
देशात 30 राज्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने थैमान घातले असून, दुसरीकडे पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यांत तापमानात वाढ झाली. मान्सूनपूर्व अवकाळीच्या तडाख्यात जनजीवन विस्कळीत झाले. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे 80 किमी वेगाने वारे वाहत असून, यामुळे फलक, खांब आणि झाडे उन्मळून पडली आहेत. उत्तर प्रदेशातील 20 जिह्यांमध्ये पाऊस आणि विजांचा कडकडाट पहायला मिळाला. एकीकडे पाऊस दुसरीकडे तापमानातील वाढ यामुळे मे महिन्यात दुहेरी संकट आले आहे.
केंद्रीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून नियोजित वेळेच्या 4 दिवस आधी देशात पोहोचू शकतो. नैऋत्य मान्सून 27 मे केरळ किनाऱ्यावर धडकेल. साधारणपणे तो 1 जूनपर्यंत रोजी केरळमध्ये पोहोचतो. जर मान्सून 27 मे रोजी आला तर 16 वर्षांत तो इतक्या लवकर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. 2009 मध्ये 23 मे रोजी आणि 2024 मध्ये 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. याशिवाय 2018 मध्ये 29 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले. 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचल्यानंतर, 8 जुलैपर्यंत मान्सून इतर राज्यांमध्ये पोहोचेल, असे हवामान खात्याने सांगितले. 17 सप्टेंबरच्या सुमारास राजस्थानमार्गे परतीचा प्रवास सुरू होतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतो. राजस्थानातील कोट, भरतपूरसह अनेक जिह्यांमध्ये पाऊस पडला. मध्य प्रदेशात वादळ, पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशातील 16 शहरांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List