इस्रायलने मदत अडवल्याने गाझात भीषण अन्नटंचाई; कासवाचे मांस खाण्याची वेळ
इस्रायलकडून सातत्याने गाझावर हल्ले सुरू असून गाझातील मदत छावण्यांमध्ये जाणारी मानवतावादी मदत अडवून धरली आहे. त्यामुळे गाझात भीषण अन्नटंचाई झाली असून लहान मुले, महिला, वृद्ध अक्षरशः भुकेने मरत आहेत. त्यामुळे जगण्यासाठी गाझातील लोकांवर समुद्रातील कासवाचे मांस खाण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. गाझापट्टीली पीडितांना काही संस्था यापुर्वी मदत करत होत्या. परंतु, आता त्यांच्याकडील अन्नसाठाही संपला आहे. गाझातील मच्छिमारांनी खाण्यासाठी सध्या समुद्रातील कासव पकडण्यास सुरुवात केली आहे. आम्ही मच्छिमार आहोत. आम्ही केवळ मासेच खायचो. आता कासवाचे मांसही खावे लागत आहे अशी प्रतिक्रीया गाझातील मच्छीमार अब्देल कनन यांनी बोलताना दिली.
सैन्याने गाझापट्टीतील लोकांना समुद्रात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे सैनिकांचा डोळा चुकवून मच्छीमार मृत्यूला तोंड देत समुद्रात प्रवेश करत आहेत. येथून बाहेर पडण्यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. सध्या तिथे पोल्ट्री नाही, भाज्या नाहीत.
मच्छिमार कासव कापून देतात, स्वच्छ करून देतात. आम्ही ते सर्वांमध्ये वाटून घेतो, प्रत्येकजण खातो आणि वाटून घेतो. कासव विक्रीसाठी नाहीत, असे गाझातील नागरिकांनी सांगितले. गाझापट्टीकडे जाणाऱया सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. येथील मार्पेटमध्ये फार काही सामान उरलेले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List