कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
काही दिवसांपूर्वी मुंबई आणि ठाण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता मराठवाड्यासह कोकणात अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण कोकण,गोवा आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 11, 2025
मध्य महाराष्ट्र जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5… भेट घ्या. pic.twitter.com/rSpiiRCOq6
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 11, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List