सायबरची कारवाई; सोशल मीडियावरील पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर समाजमाध्यमांद्वारे त्याबाबत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱया पोस्ट मोठय़ा प्रमाणात टाकल्या जात आहेत. पण त्याचे गंभीर पडसाद उमटण्याआधीच अशा पाच हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट हटविण्याचे काम महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.
पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यापासून महाराष्ट्र सायबर विभागाने समाजमाध्यमांवर प्रक्षोभक, अफवा व खोटी माहिती पसरवणाऱया पोस्टवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली. तेव्हा भडकाऊ, अफवा व खोटी माहिती पसरविणाऱ्या अनेक पोस्ट विविध समाजमाध्यमांवर करण्यात आल्या होत्या. या पोस्टच्या माध्यमातून अनुचित प्रकार किंवा नागरिकांमध्ये चुकीची माहिती जाण्याचा धोका असल्याने महाराष्ट्र सायबरने त्या वेळीच डिलिट केल्या. जवळपास पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
समाजपंटकांकडून खोटय़ा पोस्ट
काही असामाजिक घटकांकडून हल्ल्यांसंबंधीचे फसवे वृत्त पोस्ट करून अनुयायी मिळवणे, घबराट पसरवणे किंवा तणावाचे वातावरण करण्याचे प्रकार केले जात आहेत. या घटनांची नोंद घेत महाराष्ट्र सायबर विभागाने अशा खोटय़ा माहितीच्या प्रसारास थांबवण्यासाठी अनेक नोटिसा जारी केल्या आहेत. तसेच समाजमाध्यमांवरील व कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवरून अशी माहिती काढून टाकण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List