पुलवामा हल्ल्यात आमचा हात होता, पाकिस्तान सैन्याची पहिल्यांदा कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता अशी कबुली आता खुद्द पाकिस्तानने दिली आहे. तसेच यापुढेही अशा कारवाया करू असा सूचक इशाराही पाकिस्तानने दिला आहे.
पाकिस्तान हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी औरंगजेब अहमद यांनी एका पत्रकार परिषदेत ही कबुली दिली आहे. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग होता अशी कबुली त्यांनी दिली आहे. तसेच असे पुन्हा करण्याची दर्पोक्तीही त्यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेत औरंगजेब म्हणाले की, पाकिस्तानी जनतेला कुणी धमकी देत असेल, पाकिस्तानवर कुणी हल्ला करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. आम्ही या देशाचे ऋणी आहोत. देशाचा अभिमान आम्ही कुठल्याही किंमतीत राखू. तसेच आम्ही काय करू शकतो हे आम्ही पुलवामाच्या वेळी आम्ही दाखवून दिले आहे. आताही त्यात फार बदल झालेला नसून त्यांनी (हिंदुस्थानने) हे लक्षात घ्यावं असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Air Vice Marshal Aurangzeb Ahmed is the talk of the town. In just one press conference, he proved that hearts are won through professionalism and integrity—not through politics, rigging, intimidation, or force. He didn’t need to constantly remind people that the nation is with… pic.twitter.com/5pZ5SOV6gD
— Dr Waqas Nawaz (@WaqasnawazMD) May 9, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List