संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाली आहे. अशा वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा आणि पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करा असे आवाहन केले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवाही तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. आता दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे आणि पहलगाम हल्ला, ऑपरेशि सिंदूर, हिंदुस्थान – पाकिस्तान संघर्षात अमेरिकेची भूमिका यावर चर्चा करावी असे आवाहन मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांनी केले आहे.

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही असे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. पायलट म्हणाले की संसदेचे विशेष अधिवेशन आणि सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. या अधिवेशनाला आणि बैठकीला पंतप्रधान मोदींनी हजर रहावे. या अधिवेशनात आणि बैठकीत हिंदुस्थान पाकिस्तान दरम्यान झालेल्या सर्व घडामोडींवर चर्चा करावी अशी मागणीही पायलट यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;