भाजपा सरकारची मच्छिमारांसंदर्भातील धोरणे मारक, मासेमारीला कृषीचा दर्जा देऊनही फायदा होणार नाही – हर्षवर्धन सपकाळ

भाजपा सरकारची मच्छिमारांसंदर्भातील धोरणे मारक, मासेमारीला कृषीचा दर्जा देऊनही फायदा होणार नाही – हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना शासनाच्या जाचक धोरणांमुळे विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. मासेमारीमध्ये अनेक ठेकेदार व भांडवलदार शिरल्याने कोळीबांधवांवर अन्याय होत आहे. नवी मुंबई विमानतळबाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र मच्छिमार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आपल्या समस्या सरकारकडे मांडण्यासाठी सर्वप्रथम आपली संघटना बळकट करा, जे प्रश्न आहेत त्यासाठी संघर्ष करावा लागेल त्यासाठी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभा असेल. धरणक्षेत्रातील मासेमारी, तलावातील मासेमारी, नद्यातील मासेमारी संदर्भातील प्रश्न असतील किंवा नवी मुंबई विमानतळामुळे मच्छिमारांवर संकट आले आहे त्यासंदर्भात योग्य ती पावले उचलून सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करू. आता करो वा मरो ची परिस्थिती आहे. भाजपा सरकारची मच्छिमारांसंदर्भातील धोरणे मारक आहेत. कोळीबांधवांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून सर्व ताकद उभी करू, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

भाजपा सरकारने मासेमारीला कृषीचा दर्जा दिला असला तरी त्यातून फारकाही फायदा होणार नाही, ही योजनाच फसवी आहे. मच्छिमारांना बोटीसाठी लागणाऱ्या डिझेलवर सलवत मिळावी, भांडवलदार, ठेकेदार यांचा पारंपरिक मासेमारी कारणाऱ्यांना त्रास होत आहे. खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ लागत नाही. शासनाने नुकताच काढलेला जीआर या कोळी बांधवांसाठी अन्यायकारक आहे तो रद्द व्हावा. प्रकल्पग्रस्तांचा दाखला मिळावा, भाजपा सरकारने बंद केलेल्या सवलती पुन्हा लागू कराव्यात यासह विविध प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;