मुंबईत पाणीप्रश्न ऐरणीवर! धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठा; नागरिकांवर पाणीकपातीचं संकट

मुंबईत पाणीप्रश्न ऐरणीवर! धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठा; नागरिकांवर पाणीकपातीचं संकट

मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. याच्याच माऱ्याने मुंबईकर हैराण झाले असून वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 27 टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. यामुळे मुंबईकरांवर पुन्हा पाणीकपातीचं संकट निर्माण झालं आहे. उन्हामुळे एप्रिल महिन्यात मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये 15 टक्के पाण्याची घट झाली आहे. 14 मे पर्यंत हाच पाणीसाठा 10 टक्क्यांनावर येऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पाणी जपून वापर असं आवाहन केलं जात आहे.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या सात धरणांत एकूण 3 लाख 88 हजार 971 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

25 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा

अप्पर वैतरणा – 27 टक्के

मोडक सागर – 24 टक्के

तानसा – 22 टक्के

मध्य वैतरणा – 32 टक्के

भातसा – 26 टक्के

विहार – 39 टक्के

तुळशी – 38 टक्के

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दगडूशेठ हलवाई मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप दगडूशेठ हलवाई मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील नामांकित श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातही मोठय़ा प्रमाणात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, दोनच दिवसापूर्वी...
सैफ अली खान हल्ला प्रकरण- सुटकेसाठी आरोपीचा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अर्ज
प्रोटोकॉलची ऐशीतैशी… निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्र्यांच्या मुलाचे नाव, अहिल्यानगरमध्ये महायुतीत पुन्हा धुसफूस
इंदूर ठरले देशातील पहिले भिकारीमुक्त शहर, महिला बालकल्याण विभागाची माहिती
India Pakistan War – पाकिस्तानी सैन्याची चौकी, ड्रोन लॉन्चपॅड बेचिराख; हिंदुस्थानचा जोरदार पलटवार
ओशिवरात शाळेच्या मैदानात बेकायदा मदरसा! उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश
महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य, अखेर सिडकोने दाखल केले प्रतिज्ञापत्र