जम्मू – कश्मीर, पंजाब, राजस्थानसह सात राज्यांमध्ये ब्लॅक आऊट, सायरन वाजले; पाकिस्तानचे हल्ले हिंदुस्थानने परतवले
म्मू, पठाणकोट, उधमपूर, जैसलमेर आणि पंजाबमधील होशियारपूर येथील लष्कराच्या तळांवर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र, हिंदुस्थानच्या एअर डिफेन्स सिस्टमने हे हल्ले निष्क्रीय करण्यात आल्याचे आणि शेकडो ड्रोन्स पाडण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. जम्मू विमानतळ, जम्मू रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत आणि जम्मूला लागून असलेला सीमावर्ती भागात आरएस पुरा येथे पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि गुजरात, मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेशात ब्लॅक आऊट करण्यात आला. सातत्याने सायरन वाजत होते.
घाबरू नका… नागरिकांना आवाहन
पाकिस्तानातून सोडण्यात आलेली क्षेपणास्त्रs आणि ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिकांनी केल्यानंतर कश्मीरमधील बारामुल्ला आणि पंजाबमधील पठाणकोटसह अनेक ठिकाणी पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आला. घाबरू नका, माता वैष्णोदेवी आपल्यासोबत आहे. हिंदुस्थानी सशस्त्र दलही सज्ज आहे, असे आवाहन जम्मू आणि कश्मीरचे पोलीस महासंचालक शेष पॉल वैद यांनी केले.
जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न
पाकिस्तानकडून जम्मू विमानतळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवरही ड्रोनने मोठय़ा प्रमाणावर हल्ले करण्यात आले. सांबा येथून मोठय़ा प्रमाणावर आर्टिलरी आणि ड्रोन हल्ले करण्यात आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, अधिकाऱयांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मिसाईल इंटरसेप्शन सिस्टम सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.
अमित शहा यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमेवरील परिस्थितीचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला. सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालकांशी संपर्क साधून चर्चा केली. तसेच सीआयएसएफच्या महासंचालकांशीही चर्चा करून देशातील विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. गृहमंत्रालय पाकिस्तानकडून होणाया प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.
पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने पाडली
भारताने पाकिस्तानची दोन जे एफ 17 आणि जेएफ 16 अशी तीन विमाने पाडली असून तशी कबुली पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. पाकिस्तानचे एक विमान राजस्थानमध्ये पाडण्यात आले असून त्याचे अवशेष लष्कराच्या हाती लागली आहेत. भारताशी कुरापत करण्याच्या प्रयत्नामुळे पाकिस्तानने दोन विमाने गमावली.जे एफ विमाने ही चीनने पाकिस्तानला दिली होती.
शहीद जवान दिनेश कुमार यांना अखेरचा निरोप
पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना हरयाणाच्या मोहम्मदपूर गावचे 32 वर्षीय लान्स नायक दिनेश कुमार शहीद झाले. आज त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनेश कुमार यांना अखेरचा निरोप देताना त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण गाव अत्यंत शोकाकूल होते. भारत माता की जय, दिनेश कुमार अमर रहे अशा घोषणा गावकऱयांनी दिल्या. तो एक शूर सैनिक होता. माझी इतर दोन मुलेही सैन्यात आहेत. दिनेशचा मुलगाही भविष्यात सैन्यात जाऊन वडिलांचा वारसा पुढे नेईल, असे डबडबलेल्या डोळय़ांनी दिनेश कुमार यांचे वडील दया राम शर्मा सांगत होते. दरम्यान, दिनेश कुमार यांच्या पत्नीचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले.
बंकरमध्ये आसरा, घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन
सीमेलगतच्या भागात विविध ठिकाणी नागरिकांनी बंकरमध्ये आसरा घेतला आहे. घरातून बाहेर पडू नये. सातत्याने सायरन वाजला तरी घाबरून जाऊ नये. तसेच तणावाखाली येऊ नये. कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये असे आवाहन पेंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. ब्लॅक आऊट झाल्यास तणावाखाली जाऊ नये, गोंधळ करू नये, संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन जम्मू कश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी कले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List