‘120 कोटी रुपयांची कमाई तर केवळ…’, WAVES Summit 2025 मध्ये ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ बद्दल सांगितले…

‘120 कोटी रुपयांची कमाई तर केवळ…’, WAVES Summit 2025 मध्ये ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ बद्दल सांगितले…

मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटरमध्ये गुरुवारपासून WAVES समिट 2025 ची रंगारंग सुरुवात झाली. यात दुनियाभरचे कलाकार, उद्योजक आणि क्रिएटर्स सहभागी होत आहेत. या समिटमध्ये देश आणि जगभरातील सिनेमाशी जोडलेले लोक सहभागी होत आहेत.विषयांवर चर्चा होत आहे. इव्हेंटच्या पहिल्याच दिवशी अल्लू अर्जुन, शेखर कपूर, दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान सारख्या कलाकारांनी आपली मते मांडली. तर दुसऱ्या दिवशी विजय देवरकोंडा, आमिर खान आणि करीना कपूर सारख्या दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला.

आपण सर्वात मोठे उपभोक्ता मार्केट

आपण १४० कोटीहून अधिक लोकसंख्येचे आहोत. जगातली सर्वात मोठी बाजारपेठ संबोधले जाते. कोणताही कार ब्रँड असो किंवा टुथपेस्ट, चॉकलेट्स वा रेस्टॉरंट्स सर्व जागतिक ब्रँड भारतात आपली उत्पादने विकतात आणि दुकाने उघडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे आपण सर्वात मोठे उपभोक्ता मार्केट आहोत. आम्ही आपल्या भावनांना,आपल्या ब्रँड्सना, आपल्या कन्टेन्ट विक्रीच्या सवयींना कोणा बाहेरील व्यक्तीहून अधिक जाणत आहोत असे दिग्दर्शक ओम राऊत यांनी सांगितले.

आता पर्यंत यशस्वी युनिव्हर्स मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्स राहीले आहे. मार्व्हलमुळे आपल्या सर्वोच्च यशावर असताना डिज्नीने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर २३ टक्के योगदान दिले.म्हणजेच जगभरात विक्री झालेली २३ टक्के तिकीट्स मार्व्हल वा डिज्नी फिल्मचे होते.याचा अर्थ नेब्रास्काचा एक मुलगा तोच कंटेन्ट पाहात आहे जो मुंबईत विक्रांत आणि ताची टीम पाहात आहे. त्याच प्रकारे जसे विराट कोहली संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे.त्यामुळे एक सारखा कन्टेन्ट संपूर्ण जगात पाहीला जाऊ शकतो.त्यामुळे आपण कंन्टेन्ट थोडा मॉडीफाय केला तर ग्लोबल दर्शकांसाठी देखील तो सुलभ होईल. अखेर कलाकाराला त्याची कला ज्यास्तीत जास्त प्रेक्षकाला पाहायला मिळावी अशीच इच्छा असते असे दिग्दर्शक ओम राऊत यांनी सांगितले..

पहिला चित्रपट मराठी

ओम राऊत पुढे म्हणाले की मी आकडे देत आहे जेणेकरून किती लोकांनी ते पाहिले याचा अंदाज येईल. माझा मराठीतला पहिला चित्रपट ‘लोकमान्य: एक युगपुरुष (२०१५).  महाराष्ट्रात या चित्रपटाने १४ कोटींची कमाई केली. मराठी नसलेल्या लोकांपैकी खूप कमी लोकांनी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाने बंगळुरू, इंदूर आणि दिल्लीमध्ये काही पैसे कमवले. माझ्या भाषेत बनवल्या जाणाऱ्या खास चित्रपटांची काही मागणी आहे हे मला जाणवले. दक्षिण मुंबईतील एका मुलाने मराठी चित्रपट बनवला आणि तो बेंगळुरूमध्ये पाहिला जातो हे पाहून मला खूप आनंद झाला असेही ते यावेळी म्हणाले.

 तेलुगूचे हक्क १२० कोटी रुपयांना

ते पुढे म्हणाले की ,मग मी माझा तिसरा चित्रपट, आदिपुरुष (२०२३) बनविला. हा चित्रपट हिंदी आणि तेलगूमध्ये एकाच वेळी चित्रित करण्यात आला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तेलुगू बाजारातील हक्क १२० कोटी रुपयांना विकले गेले. याचा अर्थ असा की इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी चित्रपट पाहिला. माझा वितरकही कदाचित इथेच कुठेतरी असेल, जर मी चूक असेन तर तो मला दुरुस्त करू शकेल. ते पुढे म्हणाले, एका कलाकाराने जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जर आपण आपल्या स्थानिक कथा प्रामाणिकपणे आणि ताकदीने सांगितल्या तर त्या जगभर पाहिल्या जातील असेही ओम राऊत यांनी स्पष्ट केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कुख्यात गुन्हेगाराला भरवला केक! विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कुख्यात गुन्हेगाराला भरवला केक!
‘विधानसभा उपाध्यक्षपदावर असल्याने आता व्यवस्थित वागले पाहिजे,’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्याला अण्णा बनसोडे यांनी केराची टोपली दाखविल्याचे समोर...
Pahalgam Terror Attack पहलगामचा बदला कधी? दिल्ली आणि इस्लामाबादेत सध्या बैठकांवर जोर
एजाज खानला पाठवणार समन्स
देशभरात उद्या मॉकड्रील, ब्लॅकआऊट होणार… युद्धाचा सायरन वाजणार
एक साडेचार फुटांचा मंत्री…वडेट्टीवार यांचा नितेश राणेंना टोला
गणरायाच्या पीओपी मूर्तींवर सरकार प्रसन्न! राज्याच्या अहवालावर भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश…
नीट काम करा नाहीतर तुमची जागा रोबो घेईल, अजितदादांनी कर्मचाऱ्यांना झापले