IPL मुळे शेतकऱ्याचा मुलगा झाला कोट्यधीश, Dream11 वर 39 रुपये लावून पठ्ठ्याने जिंकले 4 कोटी

IPL मुळे शेतकऱ्याचा मुलगा झाला कोट्यधीश, Dream11 वर 39 रुपये लावून पठ्ठ्याने जिंकले 4 कोटी

जगातील सर्वात मोठी लीग अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा धमाका सध्या सुरू आहे. आयपीएल सुरू असताना तुमची ड्रीम टीम निवडा आणि कोट्यवधी जिंका अशी जाहिरात तुम्ही अनेकदा पाहिली असेल. आपल्याकडे आयपीएल सुरू असताना टीम निवडणाऱ्यांची संख्याही कमी नाही. याच ड्रीम11 वर थोडीफार रक्कम जिंकणारे तुम्ही तुमच्या आजूबाजूलाही पाहिलेही असतील. मात्र उत्तर प्रदेशमधील कौशंबी जिल्ह्यातील मंगल सरोज या शेतकऱ्यांच्या मुलाला ड्रीम11 ने कोट्याधीश केले आहे. अवघे 39 रुपये लावून या पठ्ठ्याने 4 कोटी रुपये जिंकल्याचे वृत्त ‘न्यूज 18 हिंदी‘ने दिले आहे.

मंगल सरोज हा मार्च महिन्यापासून ड्रीम11 वर टीम लावत आहे. आतापर्यंत त्याने 77 वेळा टीम लावली, मात्र प्रत्येक वेळेस नशीबाने त्याला धोका दिला. मात्र 29 एप्रिलला 78व्यांदा त्याने ड्रीम11 वर टीम लावली आणि 4 कोटी रुपये जिंकले.

याबाबत बोलताना मंगल सरोज याने सांगितले की, मार्च महिन्यापासून ड्रीम11 वर सातत्याने पैसे लावत आहे. प्रत्येक वेळी 49 रुपये लावायचो आणि हरायचो. पण मी हार मानली नाही. यावेळेस खात्यात फक्त 39 रुपये होते, आणि तेवढेच पैसे लावले. 29 मार्चला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये झालेल्या लढतीवेळी टीम बनवली आणि बाजी मारली. ड्रीम11 वर 4 कोटी जिंकल्याचे दाखवत आहे, पण हे पैसे अद्याप खात्यात जमा झालेले नाही, असेही त्याने सांगितले.

दरम्यान, मंगल सरोज हा उत्तर प्रदेशमधील कौशंबी जिल्ह्यातील घासीराम येथील रहिवासी आहे. त्याचे वडील सुखलाल सरोज हे सरकती असून दुसऱ्याची शेती घेऊन कसतात. शेतीतील काही उत्पन्न मालकाला, तर उर्वरित याच्यातून स्वत:च्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. आता मंगलने ड्रीम11 वर 4 कोटी जिंकल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून गावातील लोकही त्यांच्या घरी अभिनंदनासाठी येत आहेत. ड्रीम11 वर जिंकलेल्या पैसे योग्य जागी गुंतवणार असून उद्योग-व्यवसायासाठी वापरणार असल्याचे मंगल सरोज याने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;