पांढरे केस, डार्क सर्कल्स… खरंच अशी दिसते श्वेता तिवारी? काही फोटो पाहिल्यानंतर म्हणाल…
Shweta Tiwari Look: बॉलिवूड अभिनेत्री, टीव्ही अभिनेत्री स्वतःला फिट आणि सुंदर ठेवण्यासाठी अनेक उपाय करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री त्यांच्या चाहत्यांना देखील फिट राहण्याचा सल्ला देत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी… श्वेता तिवारी हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आजही चाहत्यांमध्ये श्वेता तिवारी हिची क्रेझ कायम आहे. दरम्यान श्वेता तिवारी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेले श्वेता तिवारी हिचे फोटो खरे नसून फेक आहेत. एआयच्या मदतीने श्वेता तिवारीचे फोटो तयार करण्यात आले आहे. आता श्वेता तिवारी 43 वर्षांची आहे. तर वयाच्या 80 व्या वर्षी श्वेता व्हायरल होत असलेल्या फोटोंप्रमाणे दिसेल… असं सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये श्वेता तिवारीच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स आणि डाग दिसत आहेत. शिवाय अभिनेत्रीचे केस देखील पांढरे झालेले दिसत आहे. पण वयाच्या 80 व्या वर्षी देखील श्वेता स्वतःला फिट ठेवेल… अशी देखील चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली आहे.
फिटनेसबद्दल श्वेता तिवारी म्हणते, ‘स्वतःची कधीच फसवणूक करु का…’ श्वेता कायम स्वतःच्या फिटनेसची काळजी घेते. नियमीतपणे अभिनेत्री स्वतःचं फिटनेस रुटीन फॉलो करत असते. श्वेता योगा देखील करते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन गोल्स देत असते.
श्वेता तिवारी फक्त तिच्या सौदर्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. श्वेताच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अभिनेत्री सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे. अभिनेत्रीचं दोन वेळा घटस्फोट झाला आहे.
श्वेता तिवारी हिच्या पहिल्या नवऱ्याचं नाव राजा चौधरी असं होतं. तर दुसऱ्या नवऱ्याचं नाव अभिनव कोहली असं होतं. पण दोघांसोबत देखील अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज श्वेता तिच्या दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List