“एक Kiss देशील का?”; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लोकल ट्रेनमध्ये घडली धक्कादायक घटना

“एक Kiss देशील का?”; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लोकल ट्रेनमध्ये घडली धक्कादायक घटना

मुली आणि महिलांच्या विनयभंगाच्या अनेक घटना आपण दररोज ऐकत असतो. याला सेलिब्रिटी किंवा अभिनेत्रीसुद्धा अपवाद ठरत नाहीत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली असता गर्दीतल्या एका व्यक्तीने तिचा हात खेचला होता. या घटनेनंतर आता आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवासादरम्यान अभिनेत्रीसोबत ही घटना घडली होती. या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली होती.

दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम करणारी अभिनेत्री मालविका मोहननने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “लोक अनेकदा म्हणतात की मुंबई ही महिलांसाठी सुरक्षित आहे. पण या दृष्टीकोनाबद्दल मला जरा बोलायचं आहे. आज माझी स्वत:ची गाडी आणि ड्रायव्हर आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती मला विचारत असेल की मुंबई सुरक्षित आहे का, तर माझं उत्तर कदाचित हो असेल. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होती आणि ट्रेन किंवा बसने प्रवास करत होती, तेव्हा मला अजिबात सुरक्षित वाटलं नव्हतं.”

“ती घटना मला आजही नीट लक्षात आहे. मी माझ्या दोन मैत्रिणींसोबत लोकल ट्रेनने प्रवास करत होती. तेव्हा कदाचित रात्रीचे 9.30 वाजले होते. आम्ही फर्स्ट क्लासने प्रवास करत होतो आणि त्यावेळी डब्बा तसा रिकामाच होता. आमच्या तिघींशिवाय कम्पार्टमेंटमध्ये कोणीच नव्हतं. मी खिडकीजवळ बसले होते. तेव्हा अचानक एक माणूस आम्हा तिघींना बघून खिडकीच्या ग्रिलजवळ आला. त्याने त्याचा चेहरा ग्रिलजवळ आणून म्हणाला, एक चुम्मा देगी क्या? (एक किस देशील का?) आम्ही तिघी स्तब्ध झालो होतो. अशा परिस्थितीत कसं वागायचं हे त्या वयात समजतही नाही. जर तो आमच्या डब्ब्यात चढला असता तर काय झालं असतं? आपण सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या कोणत्याही महिलेला विचारलं तरी ती असंख्य अशा घटना सांगेल. कोणतीच जागा पूर्णपणे सुरक्षित वाटत नाही”, असं ती पुढे म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुष्पा 2 च्या  ब्लॉकबस्टर यशानंतर सुपरस्टार झालास, आता नवी ओळख काय असेल? पाहा अल्लू अर्जुन काय म्हणाला? पुष्पा 2 च्या ब्लॉकबस्टर यशानंतर सुपरस्टार झालास, आता नवी ओळख काय असेल? पाहा अल्लू अर्जुन काय म्हणाला?
पुष्पा पार्ट 1 आणि पुष्पा पार्ट 2 या दोन्ही चित्रपटांनी अभिनेता अल्लू अर्जुनला एक वेगळी ओळख मिळून दिली. या चित्रपटांमुळे...
मैं झुकेगा नहीं साला…पुष्पाच्या या जगप्रसिद्ध डायलॉग मागे कोण? अल्लु अर्जुन याने सांगितले
Allu Arjun In Waves Summit 2025 : सिक्स पॅक करण्यासाठी हिरोईनकडून घेतली प्रेरणा, अल्लू अर्जुननं सांगितलं फिटनेसचं महत्त्व!
WAVES 2025: भारत डिजिटल क्रांतीचे…; श्रद्धा कपूरने घेतली इंस्टाग्राम प्रमुखांची भेट
Blue Tea : हृदयविकार असलेल्यांनी ब्लू टी प्यायल्यास काय होतं? जाणून घ्या
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मुलगी शांताबाई साठे यांचे निधन
मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल