HSC Result 2025 – बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी; कोकण विभाग अव्वल, तर लातूर खालून पहिला

HSC Result 2025 – बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी; कोकण विभाग अव्वल, तर लातूर खालून पहिला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर सोमवारी करण्यात आला आहे. राज्याचा बारावीचा निकाल यंदा 91.88 टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल राहिला, तर लातूर विभागाचा खालून पहिला नंबर लागला आहे.

ऑनलाईन निकाल जाहीर करण्यापूर्वी शिक्षण विभागाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. ज्यात शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना mahresult.nic.in सह अन्य अधिकृत वेबसाईट्सवर दुपारी एक वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे.

कोकण अव्वल, लातूर खालून पहिले

कोकण – 96.74 टक्के
कोल्हापूर – 93.64 टक्के
मुंबई – 92.93टक्के
संभाजीनगर – 92.24टक्के
अमरावती – 91.43 टक्के
पुणे – 91.32 टक्के
नाशिक – 91.31 टक्के
नागपूर – 90.52 टक्के
लातूर – 89.46 टक्के

मुलींनी मारली बाजी

यंदाही बारावीच्या परीक्षेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 94.58 टक्के, तर मुलांचा निकाल 89.51 टक्के लागला आहे. तसेच यंदा 1929 महाविद्यालयांचा निकाल 100 लागला आहे, तर 38 महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. मात्र यंदा बारावीच्या निकालात घट झाली असून मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा निकाल 1.49 टक्क्यांनी कमी झाला आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल 93.37 टक्के इतका लागला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;