लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांनी आभाळातून पैसे आणायचे का? हसन मुश्रीफ संजय शिरसाटांवर भडकले
विधानसभा निवडणूकीत महिलांची मते मिळवण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली. मात्र आता ही योजना सरकारला डोईजड होत आहे. या महिन्याचा महिलांचा योजनेचा हफ्ता देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी पळवला. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट त्यांच्यावर प्रचंड संतप्त झाले व त्यांनी अजित पवारावर जोरदार टीका केली.
आता यावरून महायुतीतील वाद वाढण्याची शक्य़ता आहे. संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला अजित पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी कोल्हापूरात बोलताना त्यांनी शिरसाट यांना उत्तर दिले.
”संजय शिरसाट हे नव्यानेच मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी. लाडक्या बहिणींना पैसे द्यायला अजित पवार यांनी काय आभाळातून पैसे आणायचे का? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी संजय शिरसाट यांना केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List