चेहऱ्यावर तजेला येण्यासाठी काकडीचा मसाज ठरेल बेस्ट!
सध्याच्या घडीला तापलेलं उन पाहता, घराबाहेर पडण्यापेक्षा घरीच राहण्याचा निर्णय अनेकजण घेताना दिसतात. आपण कोणत्याही कामासाठी बाहेर जातो तेव्हा, आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीनचा थर लावतो. तरीही सूर्यकिरणांचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. बराच वेळ बाहेर राहिल्याने चेहऱ्यावर लालसरपणा आणि जळजळ होऊ लागते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी बाजारात अनेक क्रीम उपलब्ध आहेत. पण ते वापरण्याऐवजी, चेहऱ्यावर काकडी वापरणे चांगले. काकडी चेहऱ्यासाठी खूप चांगली असते. काकडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. चेहऱ्यावर काकडी लावल्यामुळे सूज, लालसरपणा आणि जळजळ कमी करण्यास मदत होते.
चेहऱ्यावर थंड काकडीचा मसाज कसा करायचा
काकडीचे दोन तुकडे करावे लागतील आणि काही काळ फ्रीजरमध्ये ठेवावे लागतील. काकडीचा मसाज करण्याआधी कोणत्याही प्रकारचे क्रीम किंवा मेकअप लावू नये. काकडीने चेहऱ्यावर चांगले मसाज करा. यासाठी काकडी गोलाकार चेहऱ्यावर फिरवावी. त्यानंतर काकडी तशीच चेहऱ्यावर काही काळ ठेवावी. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करावा. यामुळे चेहऱ्यावरील निम्म्या समस्या कमी होतील.
या गोष्टी लक्षात ठेवा.
चेहऱ्यावर ब्लीच करत असाल तर, त्यानंतर लगेच काकडी वापरू नका.
थंड केलेली काकडी चेहऱ्यावर लावू शकता. चेहऱ्यावर काकडी लावल्यानंतर लगेच उन्हात बाहेर जाऊ नका.
चेहऱ्यावर काकडीचा वापर करावा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील. तसेच, तुमचा चेहरा थंड राहील. तुम्हाला हवे असल्यास, इतर काहीही वापरण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List