Pahalgam Terror Attack पहलगामचा बदला कधी? दिल्ली आणि इस्लामाबादेत सध्या बैठकांवर जोर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची चोहोबाजूंनी काsंडी केली. परंतु केवळ शब्द नको बदला हवा, अशी मागणी देशभरातून आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांकडून होत असताना दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तसेच पंतप्रधान कार्यालयांत बैठकांवर जोर आहे. क्षेपणास्त्र चाचण्या, हवाई आणि नौदलाचा सरावही सुरू आहे. तर हिंदुस्थानचा रुद्रावतार पाहून बिथरलेल्या पाकिस्तानने इस्लामाबादेत सर्वपक्षीय बैठक बोलावली. तसेच राष्ट्रपती आसीफ अली झरदारी यांनी एकदिवसीय अधिवेशन बोलावले. बैठकीत एकत्र येण्याचे आवाहन तर अधिवेशनात हिंदुस्थानविरोधात निषेधाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
पेंद्रीय संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. रविवारी एअरचीफ मार्शल ए.पी. सिंह आणि नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांच्यासोबत पंतप्रधानांची बैठक झाली. एअरचीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा व्यवस्था आणि पुढील रणनीती याबद्दल चर्चा केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी हवाई दल तयार असून पश्चिमेकडील सीमेवर संरक्षण नेटवर्क पूर्णपणे सक्रीय आहे तसेच राफेल लढाऊ विमानेही सज्ज ठेवण्यात आल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
फतेह क्षेपणास्त्राची चाचणी
पाकिस्तानी सैन्याने 120 किलोमीटरपर्यंत जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱया फतेह या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्याआधी 3 मे रोजी पाकिस्तानने अब्दाली या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र 450 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.
एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाकिस्तानच्या निधीत कपातीची मागणी
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष मासातो कांडा यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पाकिस्तानला देण्यात येणाऱया निधीत कपात करण्याची मागणी केली. याआधी पाकिस्तानला देण्यात आलेल्या कर्जांचा फेरआढावा घेण्याची मागणी जागतिक बँकेकडे करण्यात आली आहे. पाकिस्तान सायबर पर्ह्स नावाच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून हिंदुस्थानने पाकिस्तानवर सायबर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे.r सैन्य इंजिनीयरिंग सेवा आणि मनोहर पर्रिकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेवर आरोप करण्यात आला आहे.
सर्वपक्षीय बैठकीत इम्रान खान यांचा पक्ष नाही
तणावाखाली असलेल्या पाकिस्तानच्या मंत्र्यांनी आणि सैन्य दलाच्या प्रवक्त्यांनी रविवारी रात्री उशिरा सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली. बैठकीत इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी, सूचना मंत्री अताउल्लाह तयार यांनी सद्यस्थिती आणि सुरक्षेबाबतची सविस्तर माहिती दिली. बैठकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचा समावेश नव्हता. हिंदुस्थानकडून हल्ला झालाच तर सर्व राजकीय पक्ष पाकिस्तानसोबत एकजुटीने उभे राहातील यावर या वेळी शिक्कामोर्तब करण्यात आले. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पार्टीने पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी बैठकीत सहभाग घेतला नाही.
रशियाचा पाठिंबा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पह्नवरून चर्चा केली. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद्यांनी बळी घेतलेल्या निरपराध हिंदुस्थानींच्या नातेवाईकांप्रती सहवेदना व्यक्त केल्या तसेच दहशतवादविरोधी लढाईत हिंदुस्थानच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
पाकिस्तानी संसदेत हिंदुस्थानचा निषेध
पाकिस्तानच्या उलटय़ा बोंबा सुरूच आहेत. आज बोलावण्यात आलेल्या संसदेच्या एकदिवसीय आधिवेशनात हिंदुस्थानविरोधात निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. हिंदुस्थानसोबतच्या वाढत्या तणावामुळे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List