मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शमीला ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. या प्रकरणी मोहम्मद शमीचा भाऊ हसीबने अमरोहा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे.
4 मे रोजी दुपारी अडीच्या सुमारास मोहम्मद शमीच्या ईमेल आयडीवर त्याला एक मेल आला. त्यात शमीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर शमीचा मोठा भाऊ हसीबने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली व शमी सध्या खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या प्रशासनालाही कळवण्यात आले.
मोहम्मद शमी हा सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. तो सनरायजर्स हैदराबाद या संघातर्फे खेळत असून तो आयपीएलमध्येही जबरदस्त कामगिरी करत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List