मुंबईकरांची उकाड्यातून होणार सुटका, मुंबईसह ठाण्याला अवकाळी पावसाचा इशारा
मुंबई आणि ठाण्यात अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच रायगड आणि पालघर जिल्ह्यातही पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबई आणि ठाण्यात अवकाळी पावसामुळे दोन्ही शहरांतील तापमान एक ते दोन अंश सेल्सियसने कमी होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मंगळवारी आणि बुधवारी या दोन दिवसांता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतील. यावेळी चारही जिल्ह्याचे कमाल तापमान हे 33 तर किमान तापमान हे 33 अंश राहिल.
मंगळवारी आणि बुधवारी चारही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजाही कडाडतील. तसेच 30 ते 40 किमी ताशी वेगाना वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List