Photo – ‘गोदावरी’ची दुर्दशा… जीवनदायिनी गोदावरीला प्रदूषणमुक्तीची प्रतिक्षा!
On
1 / 3

‘गोदावरी’ची दुर्दशा... गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी सूचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी टाळणार्या प्रशासनावर अवमान याचिका दाखल करा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. नाशिकच्या आसाराम बापू आश्रमाजवळील पानवेलींनी व्यापलेले हे नदीपात्र महापालिकेची कर्तव्यदक्षता अधोरेखित करीत आहे. (छाया : भूषण पाटील)

जीवनदायिनी गोदावरीला प्रदूषणमुक्तीची प्रतिक्षा... दक्षिणगंगा गोदावरी नदीतिरी नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो. या नदीला प्रदूषणाचा घट्ट विळखा पडला आहे. प्रदूषणमुक्तीसाठी सन २०१२ मध्ये पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, न्यायालयाच्या सन २०१८च्या आदेशानुसार प्रदूषणमुक्ती व नदी पुनरूज्जीवनाकरीता ‘नीरी’ने सूचवलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मात्र, पानवेलींनी व्यापलेल्या नदीपात्राने प्रशासनाचे पितळ उघडे पाडले. तपोवनातील गोदावरी-कपिला संगम येथील नदीपात्र गाळाने असे खच्चून भरले आहे. पानवेलींनी आच्छादले आहे. प्रवाहासोबत वाहत गेलेल्या पर्यटकाचा मंगळवारी पानवेलींमुळेच बळी गेला. याच विळख्यात अडकलेल्या एका गायीची सुटका करण्यात आली. प्रदूषणमुक्तीसाठी खर्याखुर्या उपाययोजना केव्हा होणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (छाया : भूषण पाटील)

श्रद्धेला मोल नसते... नाशिकच्या गोदावरी नदीवरील श्रीरामकुंडात देशभरातील भाविक स्नान करतात, तेथील पाणी श्रद्धेने तीर्थ म्हणून प्राशन करतात. थेट नदीत मिसळणार्या सांडपाण्याचे हे दृश्य चोपडा लॉन्स येथील आहे. गोदावरीसह तिच्या उपनद्यांची सर्वत्र हीच स्थिती आहे. निष्क्रिय शासन-प्रशासनाने भाविकांच्या श्रद्धेलाच मोल ठेवलेले नाही. (छाया : भूषण पाटील)
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
05 May 2025 16:05:31
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा...
Comment List