आंबा खाण्यापूर्वी किती वेळ पाण्यात भिजवावा?
उन्हाळ्यात टरबूज, खरबूज अशी अनेक फळे उपलब्ध असतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गोड, रसाळ आंबे खावेसे वाटतात. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी-6, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर असे अनेक पोषक घटक असतात. आंबा आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही तितकाच फायदेशीर आहे. सर्व वयोगटातील लोकांना आंबे खायला आवडतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आंबा खाताना काही खबरदारी प्रामुख्याने घ्यायला हवी. अन्यथा त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
आंबा थेट विकत घेऊन किंवा झाडावरून तोडून खाल्ला तर, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. आंबा खाण्यापूर्वी तो 3-4 तास पाण्यात भिजवून ठेवणे हे खूप गरजेचे आहे.
आंब्याच्या उष्ण स्वभावामुळे तो धुतल्यानंतर लगेच खाल्ला तर आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. म्हणून आंबा नेहमी 3-4 तास पाण्यात भिजवून खायला हवा.
आंबा मर्यादित प्रमाणात खावा अन्यथा तो फायद्याऐवजी नुकसान करू शकतो. दिवसातून 2 ते 3 पेक्षा जास्त आंबे खाऊ नये. जास्त आंबे खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरुमे येऊ शकतात.
जास्त आंबे खाल्ल्याने आपल्या त्वचेवर तसेच पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटाशी संबंधित समस्या अतिसार म्हणजेच लूज मोशन होऊ शकते.
आंबा कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. आंब्यामध्ये फायबर आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. यामुळे अॅसिडिटी आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
आंब्यामध्ये भरपूर साखर असते. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, म्हणून मधुमेही रुग्णांनी आंबा खाणे टाळावे. यामुळे साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List