एक साडेचार फुटांचा मंत्री…वडेट्टीवार यांचा नितेश राणेंना टोला
देशात जातीयवादाचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये तर दोन जाती एकमेकांपुढे उभ्या ठाकल्या जात आहेत. अशा स्थितीत महायुती सरकारचा एक साडेचार फुटांचा मंत्री नागरिकांना धर्म विचारून दुकानातून सामान विकत घेण्याचे सांगत आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना आज टोला लगावला.
नितेश राणे यांनी दापोली येथील सभेत हिंदू धर्मीयांना दुकानदारांकडून धर्म विचारून खरेदी-विक्री करण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या धर्माविषयी शंका आल्यास त्याला हनुमान चालिसा म्हणायला लावा, असे ते म्हणाले होते. त्यावरून वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर आज निशाणा साधला.
– भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे काँग्रेसला पह्डून रिकामे करण्याची वल्गना करत आहेत. पण आमचे दिवस आले तर आम्हीही चुन चुन के मारू, असे वडेट्टीवार म्हणाले. एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा केवळ वापर केला जात आहे. पुढच्या निवडणुकीत ते कुठे असतील हे पाहावे लागेल, फक्त सरकारने सीबीआय व ईडीला बाजूला करावे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List