संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, वडिलांबाबत व्यक्त केली खंत

संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, वडिलांबाबत व्यक्त केली खंत

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. वैभवीला बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. पण या घवघवीत यशाचा आनंद साजरा  करताना पाठीवर वडिलांची थाप  पडणार नाही अशी खंत वैभवीने व्यक्त केली आहे.

आज राज्यात बारावीचा निकाल लागला. संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. तिला या परीक्षेत 85.33 टक्के मिळाले आहेत. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर वैभवी म्हणाली की, हा निकाल मला अपेक्षित नव्हता. माझ्या वडिलांची निर्घृण हत्या झाली, त्याच दुःखात मी परीक्षा दिल्या. आज हे यश पहायला माझे वडिल माझ्यासोबत नाहीत ही खंत आहे. माझ्या पाठीवर त्यांची थाप नाही. माझ्या वडिलांना आमच्या कुटुंबापासून, गावापासून त्यांना हिरावलं गेलं. माझे वडिल गेल्याने आमचं कुटुंब उघड्यावर पडलं. त्यामुळे माझ्या वडिलांच्या खुनातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी वैभवीने यावेळी केली आहे.

तसेच माझी नीटची तयारी सुरु आहे अशी माहिती वैभवीने दिली. पण काल जो नीटचा पेपर झाला त्यात मला खूप कमी गुण मिळालेत. असे असले तरी माझ्या वडिलांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे असा विश्वास वैभवीने व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;