देशभरात उद्या मॉकड्रील, ब्लॅकआऊट होणार… युद्धाचा सायरन वाजणार
केंद्रीय गृह मंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना ब्लॅकआऊट आणि मॉकड्रीलचे निर्देश दिले आहेत. या वेळी सर्व राज्यांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजतील. सुरक्षा यंत्रणांना याबाबतचे आदेश देण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत नेमके काय करावे, याची माहिती नागरिकांना व्हावी या हेतूने देशभरात मॉकड्रील होणार आहे. नागरी सुरक्षा अभ्यासाचा भाग म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. शत्रूच्या हल्ल्याप्रसंगी स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List